१७ वर्षीय मुलीला शेजारच्या मुलाने पळवले!; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १७ वर्षीय मुलीला शेजारी राहणाऱ्या मुलाने पळवून नेल्याची घटना अटाळी (ता. खामगाव) येथे काल, २७ जुलैला सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. खामगाव ग्रामीण पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करत दोघांचा शोध सुरू केला आहे. आकाश राजेंद्र गवई (रा.अटाळी) असे संशयिताचे नाव आहे. गावातीलच आठवी शिकलेल्या १७ वर्षीय मुलीसोबत तो वारंवार बोलत होता. …
 
१७ वर्षीय मुलीला शेजारच्या मुलाने पळवले!; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः १७ वर्षीय मुलीला शेजारी राहणाऱ्या मुलाने पळवून नेल्याची घटना अटाळी (ता. खामगाव) येथे काल, २७ जुलैला सकाळी साडेनऊच्‍या सुमारास घडली. खामगाव ग्रामीण पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्‍हा दाखल करत दोघांचा शोध सुरू केला आहे.

आकाश राजेंद्र गवई (रा.अटाळी) असे संशयिताचे नाव आहे. गावातीलच आठवी शिकलेल्या १७ वर्षीय मुलीसोबत तो वारंवार बोलत होता. त्‍यामुळे मुलीच्‍या घरच्‍यांनी त्‍याला व त्‍याच्‍या कुटुंबियांना समजावूनही सांगितले होते. मात्र तरीही काही फरक पडला नाही. काल त्‍याने मुलीला पळवून नेले. नातेवाइकांच्‍या मदतीने मुलीच्‍या घरच्‍यांनी तिचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. गावातील लोकांनी आकाशने तिला मोटारसायकलवर बसवून नेल्याचे सांगितले. त्‍यामुळे तिच्‍या वडिलांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून आकाशविरुद्ध तक्रार दिली.