१७ वर्षे देशाची सेवा केल्यानंतर जवान गावी परतला… तो येताच गावकऱ्यांनी जे केलं ते वाचून तुम्‍हीही व्हाल अचंबित!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देशाला २० हून अधिक सैनिक देणाऱ्या शेलोडी (ता. चिखली) येथील जवान निवृत्ती अरुण बळप १७ वर्षे सैन्यदलात सेवा दिल्यानंतर निवृत्त झाले. आज, ३ जुलैला सकाळी ते गावी परतले. हा अनोखा क्षण ग्रामस्थांनी अविस्मरणीय केला. त्यांच्यावर पुष्पवृत्ती करत गावातून मिरवणूक काढली. अवघे ग्रामस्थ जवानाच्या स्वागतासाठी एकवटले होते. जवान निवृत्ती बळप २८ …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देशाला २० हून अधिक सैनिक देणाऱ्या शेलोडी (ता. चिखली) येथील जवान निवृत्ती अरुण बळप १७ वर्षे सैन्यदलात सेवा दिल्यानंतर निवृत्त झाले. आज, ३ जुलैला सकाळी ते गावी परतले. हा अनोखा क्षण ग्रामस्‍थांनी अविस्मरणीय केला. त्‍यांच्‍यावर पुष्पवृत्ती करत गावातून मिरवणूक काढली. अवघे ग्रामस्‍थ जवानाच्‍या स्वागतासाठी एकवटले होते.

जवान निवृत्ती बळप २८ जुलै २००४ ला सैन्यात भरती झाले होते. या १७ वर्षांच्‍या सेवाकाळात त्‍यांनी सियाचीन, पाकिस्‍तान बॉर्डरवर तैनात राहून सेवा दिली. निवृत्त होऊन ते घरी परतल्याची असल्याची वार्ता गावात कळताच एकच उत्‍साहाने वातावरण पसरले. कोरोनाच्‍या सावटातही नियम पाळून त्‍यांचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय ग्रामस्‍थांनी घेतला. सरपंच समाधान रिठे, सागर जायगुडे, राजू नेमाने, अमोल नेमाने, संभाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर घाटगे, शिवाजी गायकवाड, अविनाश वाळस्‍कर यांनी यासाठी पुढाकार घेऊन नियोजन केले. निवृत्ती बळप हे आज सकाळी आठला गावात दाखल होताच महिलांनी त्‍यांचे औक्षण केले. त्‍यानंतर वाहनातून जल्लोषात, वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. स्वागताने निवृत्ती बळपही भारावून गेले. मातृभूमीची सेवा करून परतलो आहे.

नोकरीची सेवापूर्ती झाली असली तरी देशसेवा अंतिम श्‍वासापर्यंत सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया त्‍यांनी बुलडाणा लाइव्‍हला दिली. शेलोडी गावाने २० हून अधिक सैनिक देशाला आजवर दिले असून, त्‍यामुळे देशसेवेची परंपरा गावाने कायम राखली आहे. बळप यांचे वडील अरुण बळप, भाऊ रवींद्र बळप शेतकरी असून, कुटुंबात आई सौ. प्रयोगबाई पत्‍नी सौ. वैशाली आणि त्‍यांना दोन्ही मुले आहेत. गावात आल्यानंतर जवान बळप यांनी माजी सुभेदार ओंकार जाधव, विश्वनाथ जायगुडे यांचे दर्शन घेतले. या अनोख्या स्वागत सोहळ्यामुळे गावात जणू उत्‍सवाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.