१८ वर्षांच्‍या तरुणीने घेतले विष; जिल्हा रुग्णालयात मृत्यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विष घेऊन १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. ही घटना गोसिंग (ता. मोताळा) येथे १७ जुलैला सायंकाळी घडली. रात्री उशिरा तिचा उपचारादरम्यान बुलडाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. शबाबाई रंगनाथ शिंदे (रा. गोसिंग) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. राहत्या घरी छबाबाईने विषारी औषध प्राशन केले होते. तिला नातेवाईकांनी लगेच …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः विष घेऊन १८ वर्षीय तरुणीने आत्‍महत्‍या केली. ही घटना गोसिंग (ता. मोताळा) येथे १७ जुलैला सायंकाळी घडली. रात्री उशिरा तिचा उपचारादरम्‍यान बुलडाणा येथे जिल्हा सामान्य रुग्‍णालयात मृत्‍यू झाला. शबाबाई रंगनाथ शिंदे (रा. गोसिंग) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. राहत्या घरी छबाबाईने विषारी औषध प्राशन केले होते. तिला नातेवाईकांनी लगेच उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले होते. मात्र अधिक प्रमाणात विष प्राशन केलेले असल्याने रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्‍यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही. बोराखेडी पोलीस तपास करणार आहेत.