१८ वर्षांच्‍या दोन तरुणींसह ६ जण ४ दिवसांत बेपत्ता!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील व्यक्तींचे बेपत्ता होण्याचे सत्र चालू ऑक्टोबर महिन्यातही सुरू आहे. चारच दिवसांत सहा जण बेपत्ता झाले असून, यात १८ वर्षांच्या दोन तरुणींचा समावेश आहे. याशिवाय एक २१ वर्षीय विवाहिता आणि तीन पुरुषही गायब झाले आहेत. वरवंड (ता. बुलडाणा) येथील ऑटो स्टॉपवरून अंजली शरद जाधव ही १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची …
 
१८ वर्षांच्‍या दोन तरुणींसह ६ जण ४ दिवसांत बेपत्ता!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील व्‍यक्‍तींचे बेपत्ता होण्याचे सत्र चालू ऑक्‍टोबर महिन्यातही सुरू आहे. चारच दिवसांत सहा जण बेपत्ता झाले असून, यात १८ वर्षांच्‍या दोन तरुणींचा समावेश आहे. याशिवाय एक २१ वर्षीय विवाहिता आणि तीन पुरुषही गायब झाले आहेत.

वरवंड (ता. बुलडाणा) येथील ऑटो स्‍टॉपवरून अंजली शरद जाधव ही १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात १ ऑक्‍टोबरला झाली, तर दसरखेड (ता. मलकापूर) येथील मीरा जगन्नाथ महाजन ही १८ वर्षांची तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३ ऑक्‍टोबरला करण्यात आली. मेहकर शहरातील आंबेडकरनगरातून २१ वर्षीय सौ. पूजा दीपक पिंपळे ही चिमुकल्या मुलीसह घरातून निघून गेल्याची नोंद १ ऑक्‍टोबरला मेहकर पोलीस ठाण्यात झाली आहे.
हे पुरुष बेपत्ता…
मलकापूर शहरातील यशोधामनगरातील रहिवासी रवी ओमप्रकाश अग्रवाल हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्‍यांच्‍या घरच्यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात काल, ४ ऑक्‍टोबरला केली. महीमळ (ता. चिखली) येथील आकाश पंढरीनाथ भालेराव हा २५ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची नोंद अमडापूर पोलीस ठाण्यात कालच करण्यात आली. पिंपळगाव काळे (ता. जळगाव जामोद) येथील गणेश श्यामराव वरणकार हा ३० वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची नोंद २ ऑक्‍टोबरला जळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली.
जिल्ह्यात सप्‍टेंबरमध्ये ६४ बेपत्ता
गेल्या सप्‍टेंबर महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातून ६४ जण बेपत्ता झाले आहेत. यात ३५ पुरुष तर २९ महिलांचा समावेश आहे. यात १८ ते २५ वयोगटातील १८ तरुणी गायब झाल्या आहेत.