१९ वर्षीय विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल!; देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) ः १९ वर्षीय विवाहितेने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना देऊळगाव राजा तालुक्यातील कुंभारी येथे आज, ४ जुलैला सकाळी ११ च्या सुमारास समोर आली. सौ. छाया गणेश म्हस्के असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात सासरच्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल …
 

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा ) ः १९ वर्षीय विवाहितेने राहत्‍या घरीच गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना देऊळगाव राजा तालुक्यातील कुंभारी येथे आज, ४ जुलैला सकाळी ११ च्‍या सुमारास समोर आली.

सौ. छाया गणेश म्हस्के असे आत्‍महत्‍या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात सासरच्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, छायाचा विवाह कुंभारी येथील गणेश एकनाथ म्हस्के याच्यासोबत एक वर्षापूर्वी अगोदर झाला होता. तिला घरकाम येत नाही, स्वयंपाक येत नाही असे म्‍हणून सासू, सासरे, पती शारीरिक व मानसिक त्रास देत होते. याला कंटाळून छायाने घरातच दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. पती गणेश म्हस्के, सासरा एकनाथ म्हस्के, सासू नंदा म्हस्के यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप निरिक्षक संदीप सोनुने व पोलीस नाईक शिवाजी बिलगे करीत आहेत.