१ एप्रिलपासून युपीत बियर होणार स्वस्त

राज्यात बियरचा खप वाढावा म्हणून सरकारने घेतला हा निर्णयलखनौ : उत्तर प्रदेशातील तळीरामांसाठी एक खुशखबर आहे. राज्यात १ एप्रिलपासून बिअरचे तसेच बियरचे दर प्रती कॅन २०रुपयांनी कमी होणार आहेत. राज्यात बियरचा खप वाढावा म्हणून त्याचे कॅनचे दरच कमी केले आहेत. हे नवीन दर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. दारू विक्रेता वेल्फेअर असोशिएशनचे सरचिटणीस कन्हैय्या मौर्य …
 

राज्यात बियरचा खप वाढावा म्हणून सरकारने घेतला हा निर्णय
लखनौ :
उत्तर प्रदेशातील तळीरामांसाठी एक खुशखबर आहे. राज्यात १ एप्रिलपासून बिअरचे तसेच बियरचे दर प्रती कॅन २०रुपयांनी कमी होणार आहेत. राज्यात बियरचा खप वाढावा म्हणून त्याचे कॅनचे दरच कमी केले आहेत. हे नवीन दर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. दारू विक्रेता वेल्फेअर असोशिएशनचे सरचिटणीस कन्हैय्या मौर्य यांनी सांगितले की, आता राज्यात बियरचा कॅन किंवा बॉटल १३०रुपयांना मिळते. सरकारने त्यात आता २० रुपयांची कपात केल्याने कॅन किंवा बॉटल ११० रुपयांना मिळेल. राज्यात बियरचा खप वाढावा,असे सरकारला वाटते. पण दुसरीकडे देशी व विदेशी दारूच्या दरात काही प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.