२२ तासांनंतरही सापडला नाही नदीत पडलेला युवक!; जिल्हा आपत्ती शोध व बचाव पथकाची शोध मोहीम सुरूच!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गणेश विसर्जन पाहताना नदीपात्रात पाय घसरून पडलेल्या नांदुरा तालुक्यातील युवक घटनेच्या तब्बल २२ तासांनंतरही सापडला नसून, जिल्हा आपत्ती शोध व बचाव पथक अनेक तासांपासून त्याचा कसोशीने शोध घेत आहेत. नांदुरा तालुक्यातील शिरसोडी येथील अक्षय संदीप वानखेडे (१८) हा निंबोळा येथे काल १९ सप्टेंबरला गणेश विसर्जन पाहण्यासाठी आला …
 
२२ तासांनंतरही सापडला नाही नदीत पडलेला युवक!; जिल्हा आपत्ती शोध व बचाव पथकाची शोध मोहीम सुरूच!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गणेश विसर्जन पाहताना नदीपात्रात पाय घसरून पडलेल्या नांदुरा तालुक्यातील युवक घटनेच्या तब्बल २२ तासांनंतरही सापडला नसून, जिल्हा आपत्ती शोध व बचाव पथक अनेक तासांपासून त्याचा कसोशीने शोध घेत आहेत.

नांदुरा तालुक्यातील शिरसोडी येथील अक्षय संदीप वानखेडे (१८) हा निंबोळा येथे काल १९ सप्‍टेंबरला गणेश विसर्जन पाहण्यासाठी आला होता. दरम्यान निंबोळा देवी संस्थानमागे असलेल्या विश्वगंगा नदी पात्रात सायंकाळी साडेचारच्या सुमारास पाय घसरल्याने तो नदीत पडला. स्थानिक कर्मचारी व गावकऱ्यांनी त्याचा नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती शोध व बचाव पथक परिसरात दाखल झाले. पथकातील कृष्णा जाधव, प्रवीण साखरे, राजेंद्र झाडगे, ड्रायव्हर पी. एस. खरे, महसूल विभाग तसेच पोलीस विभागातील अंमलदार तारासिंग पवार, गणेश आघाव, संतोष काकड, रवींद्र गीते, गुलाबसिंह राजपूत हे अक्षयचा अथक शोध घेत आहेत. मात्र आज सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत तो मिळून आला नसल्याचे संभाजी पवार यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले.