२३ वर्षांची महिला, तिला ११ मुलं, अजून हवीत ८९ मुलं!

मॉस्को : जगभरात एकीकडं कुटुंब नियोजनावर भर दिला जात आहे. दुसरीकडं मुल होण्याची हाैस असते; परंतु ती किती असावी, याला काहीच मर्यादा नाहीत. रशियातील एका महिलेला ११ मुलं आहेत. या दाम्पत्याला जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याची हाैस आहे. या दाम्पत्याला १०५ मुलांचं पालक व्हायचं आहे. भारतात एक हिमाचल प्रदेशात एक मोठं कुटुंब आहे; परंतु त्यापेक्षाही जगातील …
 

मॉस्को : जगभरात एकीकडं कुटुंब नियोजनावर भर दिला जात आहे. दुसरीकडं मुल होण्याची हाैस असते; परंतु ती किती असावी, याला काहीच मर्यादा नाहीत. रशियातील एका महिलेला ११ मुलं आहेत. या दाम्‍पत्याला जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याची हाैस आहे. या दाम्‍पत्याला १०५ मुलांचं पालक व्हायचं आहे.

भारतात एक हिमाचल प्रदेशात एक मोठं कुटुंब आहे; परंतु त्यापेक्षाही जगातील सर्वात मोठं कुटुंब करण्याचा मानस या रशियातील या दाम्‍पत्याचा आहे. विक्रम करण्याचा केवळ मनोदय करून हे कुटुंब थांबलेलं नाही, तर त्यासाठी त्यांनी नियोजन केलं आहे. या दाम्‍पत्याची आर्थिक स्थिती अतिशय चांगली असल्यानं त्यांना कुटुंबाचा खर्च कसा करावा, हा प्रश्न पडणार नाही. गॅलीप (वय ५६) आणि क्रिस्टीना ( वय२३) यांना आधीच ११ मुलं आहेत. गॅलीप हे कोट्यधीश आहेत. ते व्यावसायिक आहेत.

सध्या जॉर्जियात त्यांचं वास्तव्य आहे. आता ११ मुलं असली, तरी नंतर होणारी मुलं ही क्रिस्टीनापासून होतील, असं नाही. त्याचं कारण त्यांनी सरोगसीची मदत घ्यायचं ठरविलं आहे. सरोगसीचा वापर करून किती मुलं जन्माला घालायची, याची माहिती या दांपत्यानं दिलेली नाही. सरोगसी मुलांसाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची तयारी केली आहे. गॅलीप आणि क्रिस्टीना यांनी सर्वच मुलांचं योग्य पालन पोषण करण्याची हमी दिली आहे. क्रिस्टीनाचं सध्याचं वय २३ आणि तिच्या पहिल्या मुलाचं वय सहा वर्षे आहे. याचा अर्थ तिला पहिलं बाळ वयाच्या १७ व्या वर्षी झालं. अन्य दहा मुलांचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला. क्रिस्टीनाला मुलांचं पालन- पोषण करणं आवडतं.