२५ वर्षीय विवाहितेवर ४५ वर्षीय पुरुषाचा लैंगिक अत्‍याचार; पतीशी पटत नसल्याने माहेरी राहत होती, कधी गोठ्यात, कधी शेतात नेऊन करायचा अत्‍याचार!; मोताळा तालुक्‍यातील घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माहेरी राहत असलेल्या २५ वर्षीय विवाहितेवर ४५ वर्षीय पुरुषाने वारंवार लैंगिक अत्याचार केला. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे ही घटना घडली. पीडित विवाहितेने आज १८, ऑक्टोबर रोजी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अभय सुखदेव उबाळे (४५, रा. धामणगाव बढे, ता. मोताळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक …
 
२५ वर्षीय विवाहितेवर ४५ वर्षीय पुरुषाचा लैंगिक अत्‍याचार; पतीशी पटत नसल्याने माहेरी राहत होती, कधी गोठ्यात, कधी शेतात नेऊन करायचा अत्‍याचार!; मोताळा तालुक्‍यातील घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माहेरी राहत असलेल्या २५ वर्षीय विवाहितेवर ४५ वर्षीय पुरुषाने वारंवार लैंगिक अत्याचार केला. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे ही घटना घडली. पीडित विवाहितेने आज १८, ऑक्टोबर रोजी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी अभय सुखदेव उबाळे (४५, रा. धामणगाव बढे, ता. मोताळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पीडित २५ वर्षीय विवाहितेचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिला तामोडा (ता. चाळीसगाव जि. जळगाव) येथे दिले होते. मात्र नवऱ्याशी पटत नसल्याने ती केवळ दीड महिना सासरी राहिली. त्यानंतर ती माहेरी येऊन वडिलांकडे राहत होती. १ मार्च २०२१ रोजी ती एकटी शेतात जात असताना अभयने तिचा हात धरून तिला त्याच्या शेतात ओढले. तिचे केस ओढून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर म्हशींच्‍या गोठ्यात नेऊन लैंगिक अत्याचार केला. घडला प्रकार कुणाला सांगितल्यास बदनामीची व विहिरीत टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वारंवार तिला कधी म्हशीच्या गोठ्यात तर कधी शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. सततच्या जाचाला कंटाळून तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.