३३ रुग्‍ण बरे झाले की जिल्हा होणार कोरोनामुक्‍त!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३३ रुग्ण बरे झाले की जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकेल. पण आज-उद्या आणखी कोणत्या रुग्णांची भर पडायला नको! आज, १५ सप्टेंबरला अवघे ३ रुग्ण समोर आले, तर तब्बल १४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ८८४ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी …
 
३३ रुग्‍ण बरे झाले की जिल्हा होणार कोरोनामुक्‍त!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३३ रुग्‍ण बरे झाले की जिल्हा कोरोनामुक्‍त होऊ शकेल. पण आज-उद्या आणखी कोणत्‍या रुग्‍णांची भर पडायला नको! आज, १५ सप्‍टेंबरला अवघे ३ रुग्‍ण समोर आले, तर तब्‍बल १४ रुग्‍णांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ८८४ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ८८१ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ३ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील ३ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील १३९ तर रॅपिड टेस्टमधील ७४२ अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
देऊळगाव राजा तालुका : सिनगाव जहागीर १, मेहकर तालुका : जानेफळ १, नांदुरा तालुका : लोणवडी १ अशाप्रकारे जिल्ह्यात ३ रुग्ण आढळले आहेत.

एकूण बाधितांचा आकडा ८७५३४ वर
आजपर्यंत ७०५८९२ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ८६८२८ रुग्‍णांना बरे झाल्याने वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी ९४६ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८७५३४ कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या ३३ रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत ६७३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.