३४ वर्षीय महिलेला अश्लील शिविगाळ!; मेहकर तालुक्‍यातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महिलेला क्षुल्लक कारणावरून अश्लील शिविगाळ केल्या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बेलगाव (ता. मेहकर) येथे १० ऑगस्टच्या रात्री आठच्या सुमारास घडली. सौ. पल्लवी भिकाजी वानखेडे (३४, रा. बेलगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. त्यावरून जीवन सुखदेव मैंदकर, पवन सुखदेव मैंदकर, संगिता पवन मैंदकर, प्रतिभा सुखदेव …
 
३४ वर्षीय महिलेला अश्लील शिविगाळ!; मेहकर तालुक्‍यातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महिलेला क्षुल्लक कारणावरून अश्लील शिविगाळ केल्या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना बेलगाव (ता. मेहकर) येथे १० ऑगस्‍टच्‍या रात्री आठच्‍या सुमारास घडली.

सौ. पल्लवी भिकाजी वानखेडे (३४, रा. बेलगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. त्‍यावरून जीवन सुखदेव मैंदकर, पवन सुखदेव मैंदकर, संगिता पवन मैंदकर, प्रतिभा सुखदेव मैंदकर (सर्व रा.बेलगाव) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल झाला आहे. समाजाच्‍या सभामंडपात जीवन मैंदकर हा पल्लवी यांच्‍या मुलास शिविगाळ करत होता. त्‍यामुळे पल्लवी यांनी त्‍याला माझ्या मुलाला शिविगाळ का करत आहे, असे विचारले. त्‍यावरून त्‍याने त्‍यांना अश्लील शिविगाळ करण्यास सुरुवात केली. पवन, संगिता, प्रतिभा यांनीही तिथे येऊन पल्लवी यांना शिविगाळ करून लोटपोट केली. जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्‍हटले आहे.