४९ धावांवर कॅच घेणार्‍या फिल्डरला बेशुद्ध पडेपर्यंत बदडले

मध्य प्रदेशात संतप्त फलंदाजाचे कृत्य ग्वाल्हेर : क्रिकेटची बॅट ही धावा काढण्यासाठी असते.पण कधीकधी रागाच्या भरात फलंदाज त्याचा वापर समोरच्याला चोप देण्यासाठी करतात. मागे फलंदाज नवज्योतसिंह सिद्धू यांनी केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गाजली होती. आता मध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे सामन्या दरम्यान् एक फलंदाज ४९ धावांवर कॅचआऊट झाला. पण आपले अर्धशतक पूर्ण झाले …
 

मध्य प्रदेशात संतप्त फलंदाजाचे कृत्य

ग्वाल्हेर : क्रिकेटची बॅट ही धावा काढण्यासाठी असते.पण कधीकधी रागाच्या भरात फलंदाज त्याचा वापर समोरच्याला चोप देण्यासाठी करतात. मागे फलंदाज नवज्योतसिंह सिद्धू यांनी केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गाजली होती. आता मध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे सामन्या दरम्यान् एक फलंदाज ४९ धावांवर कॅचआऊट झाला. पण आपले अर्धशतक पूर्ण झाले नाही म्हणून तो इतका संतापला की, ज्याने कॅच घेतली त्याच्या अंगावर तो बॅट घेऊन धावून गेला व त्याला जमिनवर पडेपर्यंत बेदम मारहाण केली. फलंदाजाने केलेल्या मारहाणीत बिचार क्षेत्ररक्षक बेशुद्ध पडला.बेशुद्ध पडलेल्या खेळाडूचे नाव सचिन पराशर असूनत्याला ज्याने मारहाण केली त्याचे नाव संजय पालिया असे आहे. सचिनवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी संजयवर संबंधित खेळाडूला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा ुन्हा दाखल केला आहे.तो खेळाडू सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.