५४ वर्षीय म्‍हातारीचा मोबाइलमध्ये फोटो काढला; जवळ ओढले! ५२ वर्षीय म्हाताऱ्याची कुरापत..!!, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५४ वर्षीय महिलेचा मोबाइलमध्ये फोटो काढून ५३ वर्षीय म्हाताऱ्याने तिला जवळ ओढून विनयभंग केला. काल, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वृद्धेच्या तक्रारीवरून शमुन सैफुउद्दिन राजा (५४, रा. मोची गल्ली खामगाव) याच्याविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि महिला शेजारी शेजारी राहतात. काल …
 
५४ वर्षीय म्‍हातारीचा मोबाइलमध्ये फोटो काढला; जवळ ओढले! ५२ वर्षीय म्हाताऱ्याची कुरापत..!!, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५४ वर्षीय महिलेचा मोबाइलमध्ये फोटो काढून ५३ वर्षीय म्हाताऱ्याने तिला जवळ ओढून विनयभंग केला. काल, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वृद्धेच्या तक्रारीवरून शमुन सैफुउद्दिन राजा (५४, रा. मोची गल्ली खामगाव) याच्याविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी आणि महिला शेजारी शेजारी राहतात. काल दुपारी १२ च्या सुमारास महिला घराशेजारी असलेल्या बोअरचे बटन सुरू करण्यासाठी गेली. त्यावेळी सैफउद्दीनने मोबाइलमध्ये तिचा फोटो काढला. महिलेने विरोध केला असता वाईट उद्देशाने हात धरून जवळ ओढले व विनयभंग केला. महिलेने आरडाओरड केल्यावर आरोपी पळून गेला. घटनेनंतर खामगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार देण्यात आली.