७० वर्षीय वृद्धाकडून तरुणीचे लैंगिक शोषण, प्रेग्‍नंट करून गर्भही पाडला!; जळगाव जामाेद तालुक्‍यातील संतापजनक घटना, मुलगी गतिमंद, असहायतेचा फायदा उचलला!!

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतातून पाणी नेण्यासाठी येत असलेल्या १९ वर्षीय गतिमंद मुलीवर वासनांध म्हाताऱ्याची नजर पडली. त्याने तिला उचलून शेतातीलच झोपडीत नेत लैंगिक अत्याचार केला. अत्याचाराचा हा प्रकार उघडकीस न आल्याने त्याची हिंमत वाढली आणि त्याने तिच्यावर मग अत्याचाराचे सत्रच सुरू केले. यातून ती गर्भवती राहिली. त्यामुळे बिंग फुटेल या भीतीने त्याने …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतातून पाणी नेण्यासाठी येत असलेल्या १९ वर्षीय गतिमंद मुलीवर वासनांध म्‍हाताऱ्याची नजर पडली. त्‍याने तिला उचलून शेतातीलच झोपडीत नेत लैंगिक अत्‍याचार केला. अत्‍याचाराचा हा प्रकार उघडकीस न आल्याने त्‍याची हिंमत वाढली आणि त्‍याने तिच्‍यावर मग अत्‍याचाराचे सत्रच सुरू केले. यातून ती गर्भवती राहिली. त्‍यामुळे बिंग फुटेल या भीतीने त्‍याने तिचा गर्भपात करवला आणि गर्भही जाळून टाकला. ही धक्‍कादायक घटना इस्लामपूर (ता. जळगाव जामोद) येथे समोर आली आहे. जळगाव जामोद पोलिसांनी या म्‍हाताऱ्याला आज, १९ जूनला बेड्या ठोकल्या. त्‍याला मदत करणाऱ्याच्याही मुसक्‍या आवळल्‍या. दोघांना न्‍यायालयात हजर केले असता २२ जूनपर्यंत न्‍यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

देविदास बोंबटकार (७०, रा. मुक्‍ताईनगर, जि. जळगाव खानदेश, ह.मु. इस्लामपूर) असे या म्‍हाताऱ्याचे नाव असून, सुभाषसिंग मलसिंह सस्‍त्‍या (५०, रा. इस्लामपूर) असे त्‍याला मदत करणाऱ्याचे नाव आहे. दोघांना मध्यरात्रीच पोलिसांनी घरातून ताब्‍यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. इस्लामपूर शिवारात बोंबटकार याची ४ एकर शेती आहे. या शेतीलगतच पीडित तरुणी राहते. पाण्यासाठी बहुतांश वेळा या कुटुंबाला बोंबटकारच्‍या शेतात यावे लागत होते.

पीडित तरुणी एकटीच पाण्यासाठी येत असल्याचे पाहून बोंबटकारची नजर फिरली. त्‍याने तिच्‍यावर पाळत ठेवून कुणी आजूबाजूला नसल्याची संधी साधून तिला उचलून झोपडीत आणले आणि तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार केला. मात्र गतिमंद असल्याने या घटनेची वाच्‍यता पीडितेने कुठे केली नसल्याचे पाहून त्‍याची हिंमत वाढली. त्‍याने मग वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. यातून ती गर्भवती राहिली. ही बाब लक्षात येताच त्‍याने तिचा गर्भपात करवला. पाडलेला स्‍त्री जातीचा गर्भही जाळून टाकला. यात त्‍याला सुभाषसिंगने मदत केली.

असे फुटले बिंग…
हे सर्व आपण दडवून ठेवू. कुणाला काही कळणार नाही, असे बोंबटकारला वाटले. मात्र पोलिसांना मिळालेल्या एका निनावी पत्राने त्‍याचे बिंग फुटले. या पत्राच्‍या सत्‍यतेबाबत पोलिसांनी जेव्‍हा चौकशी सुरू केली तेव्‍हा धक्‍कादायक प्रकार समोर आला. सप्‍टेंबर २०२० पासून बोंबटकार तिचे लैंगिक शोषण करत होता. मार्चमध्ये तिच्‍या पोटात पाच ते सहा महिन्यांचा स्‍त्री जातीचा गर्भ होता. हा गर्भपात केल्यानंतर, तो जाळल्‍याचेही तपासात समोर येत गेले. तपास कर्तव्‍यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, पोलीस उपविभागीय अधिकारी दिलीप तडवी, पोलीस निरिक्षक सुनील जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक सतीश आढे, पोलीस उपनिरिक्षक सचिन वाकडे करत आहेत.