७२ वर्षांच्‍या आईला ३६ वर्षांच्‍या पुत्राची मारहाण!; खामगाव शहरातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून स्वतःच्या वृद्ध आईलाच ३६ वर्षीय मुलाने मारहाण केली. ही घटना आज, २८ जुलैला सकाळी आठच्या सुमारास खामगाव शहरातील शिवाजीनगर भागात घडली. वृद्ध आईच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रीमती मथुरा झुंबरलाल तिवारी (७२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना तीन मुले आहेत. पैकी हेमंत …
 
७२ वर्षांच्‍या आईला ३६ वर्षांच्‍या पुत्राची मारहाण!; खामगाव शहरातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून स्वतःच्या वृद्ध आईलाच ३६ वर्षीय मुलाने मारहाण केली. ही घटना आज, २८ जुलैला सकाळी आठच्‍या सुमारास खामगाव शहरातील शिवाजीनगर भागात घडली. वृद्ध आईच्‍या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

श्रीमती मथुरा झुंबरलाल तिवारी (७२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना तीन मुले आहेत. पैकी हेमंत झुंबरलाल तिवारी (३६) हा दोन नंबरचा मुलगा अविवाहित असून, काही दिवस खामगावच्या एका खासगी फायनान्स कंपनीत काम करत होता. काही महिन्यांपासून तो पुण्यात एका खासगी कंपनीत काम करतो. त्याची आई मथुरा त्यांच्या मोठ्या व लहान मुलासोबत राहते. हेमंत पुण्याहून घरी आल्यानंतर त्यांची आई श्रीमती मथुरा झुंबरलाल तिवारी यांना आज सकाळी म्हणाला, की मला खर्च करण्यासाठी पैसे हवे. तेव्हा त्याच्या आईने त्याला म्हटले की, मी तुला बऱ्याच वेळा पैसे दिले. तू आता पैसे मागू नको. तेव्हा हेमंत म्हणाला, तू प्लॉट विक व मला पैसे दे. त्याच्या आईने नाही म्हटले असता त्याने त्याच्या आईला लोटपाट करून शिविगाळ केली. पैसे नाही दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार वृद्ध आईने केली आहे.