७५% टक्के बुलडाणेकर प्रामाणिक!, यातले १५% अतिप्रामाणिक!!

लॉकडाऊन काळातही कराचा भरणा; ८ कोटींचे होते उद्दिष्ट्य बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वर्षभरात कोरोनाचे संकट त्यामुळे रोजगार आणि नोकरदारांवर आर्थिक संकट ओढावले असले तरी गेल्या वर्षभरात ७५ टक्के बुलडाणेकरांनी नगर परिषद कराचा भरणा केल्याची माहिती नगर परिषदेचे कर विभागप्रमुख श्रीकांत पवार यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली. बुलडाणा नगर परिषदेच्या १८ हजार करदात्यांपैकी ७५ टक्के …
 
७५% टक्के बुलडाणेकर प्रामाणिक!, यातले १५% अतिप्रामाणिक!!

लॉकडाऊन काळातही कराचा भरणा; ८ कोटींचे होते उद्दिष्ट्य

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वर्षभरात कोरोनाचे संकट त्यामुळे रोजगार आणि नोकरदारांवर आर्थिक संकट ओढावले असले तरी गेल्या वर्षभरात ७५ टक्के बुलडाणेकरांनी नगर परिषद कराचा भरणा केल्याची माहिती नगर परिषदेचे कर विभागप्रमुख श्रीकांत पवार यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना दिली.

बुलडाणा नगर परिषदेच्या १८ हजार करदात्यांपैकी ७५ टक्के करदात्यांनी कर भरला. यातील १५ टक्के जागरूक नागरिकांनी स्वतः नगर परिषदेत येऊन कर भरला. करवसुलीचे काम करण्यासाठी बुलडाणा नगरपरिषदेकडे १० लिपिक आहेत. सकाळी पावणेदहा ते सव्वासहा ही कार्यालयीन वेळ असतानाही कर विभागातील कर्मचारी सकाळी सातपासून कामावर हजर असतात. शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशीही कर विभागातील कर्मचारी करवसुलीसाठी जातात. बुलडाणा शहरातून आठ कोटींचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले होते, पैकी नेमकी किती वसुली झाली हे अंतिम हिशोब झाल्यावरच समोर येईल असेही कर विभागप्रमुख श्री. पवार यांनी बुलडाणा लाइव्‍हला सांगितले.

असा भरावा लागतो कर
पाणीपट्टी : 1950
नगर परिषदेच्या हद्दीबाहेर असल्यास 3900 रुपये
मालमत्ता कर 500 स्क्वेअर फूट साठी : 3000 रुपये

याशिवाय…
दिवाबत्ती कर, अग्निशामक कर, वृक्ष कर, पर्यावरण कर, शिक्षण कर, विशेष शिक्षण कर, व्यावसायिकांसाठी रोजगार हमी कर