७ गोवंश घेऊन निघालेला छोटा हत्ती बजरंग दल कार्यकर्त्यांनी पकडला; शेगाव तालुक्‍यातील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः छोट्या हत्तीतून दाटीवाटीने ७ गोवंशाची वाहतूक करणाऱ्याला शेगाव तालुक्यातील नागझरी रोडवर आज, ३१ जुलैला सकाळी साडेदहाच्या सुमारास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. छोटा हत्ती वाहनात (MH28 AB132) ७ गोवंश घेऊन विशाल गुरव नागझरी रोडवरून जात होता. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच त्यांनी पाठलाग करून त्याला पकडले. गोवंश …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः छोट्या हत्तीतून दाटीवाटीने ७ गोवंशाची वाहतूक करणाऱ्याला शेगाव तालुक्‍यातील नागझरी रोडवर आज, ३१ जुलैला सकाळी साडेदहाच्‍या सुमारास बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्यांनी पकडले.

छोटा हत्ती वाहनात (MH28 AB132) ७ गोवंश घेऊन विशाल गुरव नागझरी रोडवरून जात होता. बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच त्‍यांनी पाठलाग करून त्‍याला पकडले. गोवंश कुठे घेऊन जात आहे, अशी विचारणा केली असता त्‍याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. कत्तलीच्‍या उद्देशानेच हे गोवंश घेऊन जात असल्याच्‍या संशयावरून कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती दिली. वाहनचालकाला वाहनासह शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सातही गोवंश देखभालीसाठी गोरक्षण धाम येथे सोडण्यात आले. वाहन पकडणाऱ्यांत प्रखंड अध्यक्ष विजय राठी, जिल्हा गोरक्षा प्रमुख सचिन हिवरे, शहराध्यक्ष प्रवीण मोरखडे, प्रखंड संयोजक सोमेश कांबळे, नगर सहसंयोजक गजानन हरणे व विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्त्यांचा समावेश होता.