७ जण जिल्ह्यातून ३ दिवसांत गायब!; विशीच्‍या आतील ४ तरुणींचा समावेश

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यातून सात जण बेपत्ता झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे. यात चार तरुणींचा समावेश आहे. या चारही तरुणी विशीच्या आतील आहेत. सध्या त्यांचा शोध पोलीस युद्धपातळीवर घेत आहेत. निकिता सुरेश गुरचड ही १८ वर्षीय मुलगी मलकापूर शहरातील पंतनगरातून गायब झाल्याची नोंद २ सप्टेंबरला मलकापूर शहर …
 
७ जण जिल्ह्यातून ३ दिवसांत गायब!; विशीच्‍या आतील ४ तरुणींचा समावेश

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यातून सात जण बेपत्ता झाल्‍याची नोंद विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे. यात चार तरुणींचा समावेश आहे. या चारही तरुणी विशीच्‍या आतील आहेत. सध्या त्‍यांचा शोध पोलीस युद्धपातळीवर घेत आहेत.

निकिता सुरेश गुरचड ही १८ वर्षीय मुलगी मलकापूर शहरातील पंतनगरातून गायब झाल्याची नोंद २ सप्‍टेंबरला मलकापूर शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शेगाव शहरातील सुदामानगरातून १८ वर्षीय दुर्गा किशोर भोजने ही तरुणी बेपत्ता झाली असून, तशी नोंद १ सप्‍टेंबरला शेगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादोला येथील १९ वर्षीय सौ. आरती सुमेश खिल्लारे ही विवाहित तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद १ सप्‍टेंबरला करण्यात आली आहे. मोताळा तालुक्‍यातील जयपूर येथून १९ वर्षीय कविता मारोती वसतकर ही तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद बोराखेडी पोलीस ठाण्यात १ सप्‍टेंबरला करण्यात आली आहे.

हे तरुणही बेपत्ता
शेगाव शहरातील सरकारी फैलमधील रहिवासी ४० वर्षीय प्रदीप नामदेव शेगोकार हा व्‍यक्‍ती गायब झाल्याची नोंद शेगाव शहर पोलीस ठाण्यात ३ सप्‍टेंबरला करण्यात आली आहे. जळगाव जामाेद शहरातून दिलदार खान बलदार खान हा ३२ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची नोंद २ सप्‍टेंबरला जळगाव जामोद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चिखली शहरातील आनंदानगरातून २८ वर्षीय सय्यद सलमान सय्यद अली हा तरुण बेपत्ता झाल्याची नोंद चिखली पोलीस ठाण्यात १ सप्‍टेंबरला करण्यात आली आहे.