ॲपद्वारे कळणार बुलडाण्यात कोणत्‍या हॉस्पिटलमध्ये किती बेड शिल्लक!; स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज, 2 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयातील उपलब्ध बेड्सची स्थिती दर्शविणारे ॲप लाँच केले. ॲपमुळे नातेवाइकांची धावपळ वाचणार असून, रुग्णांना लवकर उपचार मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या बुलडाणा शहरापुरते हे ॲप …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज, 2 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयातील उपलब्ध बेड्‌सची स्थिती दर्शविणारे ॲप लाँच केले. ॲपमुळे नातेवाइकांची धावपळ वाचणार असून, रुग्णांना लवकर उपचार मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

सध्या बुलडाणा शहरापुरते हे ॲप मर्यादित असून, नंतर जिल्ह्यात विस्तार होणार आहे. स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरने तयार केलेल्या या ॲपचे नाव ग्रोवसरी असे आहे. एका क्लिकवर कोणत्या कोविड सेंटरमध्ये किती बेड आहेत. आय.सी.यू, ऑक्सिजन बेडची सद्यःस्थिती कशी आहे, याची माहिती ॲपद्वारे मिळणार असल्याचे श्री. तुपकर यावेळी म्‍हणाले.

असे हाताळावे ॲप

प्ले स्टोअर वरून ग्रोवसरी या नावाने सर्च करून अॅप डाऊनलोड करता येईल. यासाठीची लिंक एकमेकांना मोबाईल व्हॉट्‌स अॅपवर पाठविता येईल. अॅप ओपन केल्यावर इमर्जन्सी टॅब यावर क्लिक करावे. पुढे वेब पेज ओपन होऊन प्रत्येक कोविड रुग्णालयांमधील बेडची स्थिती समजेल. तसेच फोनच्या आयकॉनवर क्लिक केल्यास संबंधित रुग्णालयाला कॉलही करता येईल. रविकांत तुपकर यांनी ऑपची संकल्पना मांडल्यानंतर राधेय हॉटेलचे नंदू एंडोले  व त्यांचे सहकारी हर्षित कोचर यांनी तातडीने ग्रोवसरी अॅप साकारले.