ॲपेचालकाला उडवून कार सोडून देत चालक फरारी; नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा- पिंपळगाव राजा रोडवरील ज्ञानगंगापूरजवळ मारुती स्विफ्ट डिझायर कारने ॲपरिक्षाला जोरदार धडक दिली. यात ॲपेचालक गंभीर जखमी झाला. ही घटना आज, 11 मार्च रोजी रात्री 8.30 वाजता घडली. शांताराम कांशीराम धुरंधर (45, रा पिंपळगाव राजा, ता. खामगाव) असे गंभीर जखमी ॲपेचालकाचे नाव आहे. पिंपळगाव राजावरून नांदुराकडे कार …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा- पिंपळगाव राजा रोडवरील ज्ञानगंगापूरजवळ मारुती स्विफ्‍ट डिझायर कारने ॲपरिक्षाला जोरदार धडक दिली. यात ॲपेचालक गंभीर जखमी झाला. ही घटना आज, 11 मार्च रोजी रात्री 8.30 वाजता घडली.

शांताराम कांशीराम धुरंधर (45, रा पिंपळगाव राजा, ता. खामगाव) असे गंभीर जखमी ॲपेचालकाचे नाव आहे. पिंपळगाव राजावरून नांदुराकडे कार (क्र. MH 28 AZ 8498) जात होती. त्‍याचवेळी नांदुऱ्याकडून पिंपळगाव राजाकडे ॲपे चालला होता. ॲपेला कारने उडवले व रस्‍त्‍याच्‍या बाजूला जाऊन कार थांबली. धुरंधर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तातडीने गावातील तरुणांनी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले. अपघात होताच कार सोडून चालक फरारी झाला होता.