104 पैकी 40 मृत्‍यू दुचाकीस्वारांचे!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या वर्षभरात जानेवारी ते डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात 104 जणांनी अपघातात प्राण गमावल्याची माहिती बुलडाणा लाइव्हच्या समोर आली आहे. यात 141 जण जखमी झाले होते.सध्या 18 जानेवारी ते17 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. रस्ते अपघातास आळा बसावा तसेच नागरिकांत वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती निर्माण व्हावी यादृष्टीने …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गेल्‍या वर्षभरात जानेवारी ते डिसेंबर दरम्‍यान जिल्ह्यात 104 जणांनी अपघातात प्राण गमावल्याची माहिती बुलडाणा लाइव्‍हच्‍या समोर आली आहे. यात 141 जण जखमी झाले होते.
सध्या 18 जानेवारी ते17 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. रस्ते अपघातास आळा बसावा तसेच नागरिकांत वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती निर्माण व्हावी यादृष्टीने हे अभियान राबविण्यात येते. अभियानाच्या निमित्ताने जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखेने गेल्या वर्षभरात झालेल्या अपघातांची माहिती बुलडाणा लाइव्‍हला दिली आहे.

लॉकडाऊन काळात नाही अपघात
कोविडमुळे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कठोर लॉकडाऊन काळात जिल्ह्यात एकही अपघात घडला नाही. निर्बंधामुळे वाहतुकीची मर्यादित होती. लोकांना घराबाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे अपघात झाले नाहीत.
सर्वाधिक अपघात दुचाकीधारकांचे
झालेल्या अपघातांत सर्वाधिक अपघात हे दुचाकी धारकांचे आहेत. एकूण मृत्यूपैकी 40 मृत्यू हे दुचाकीस्वारांचे झाले असून, जखमींची संख्या 42 आहे. यानंतर कार चालक आणि ट्रकचालकांचा नंबर लागतो.