12 नवे कोविड केअर सेंटर सुरू; वाढत्‍या कोरोनाशी ‘युद्ध’ सुरू!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाची रुग्ण संख्या आणि बळींचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. संचारबंदी आणि अन्य उपाय योजल्यानंतर आता बाधितांच्या उपचारात हेळसांड होऊ नये म्हणून १२ कोविड केअर सेंटरला नव्याने सुरू केले असून, आता २५ कोविड केअर सेंटर रुग्णसेवेत असतील.लग्न समारंभ, छोटे-मोठे कार्यक्रम, बाजारपेठेतील वर्दळ आणि नागरिकांचा हलगर्जीपणा यामुळे कोरोनाबाधितांची …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाची रुग्‍ण संख्या आणि बळींचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. संचारबंदी आणि अन्‍य उपाय योजल्यानंतर आता बाधितांच्‍या उपचारात हेळसांड होऊ नये म्‍हणून १२ कोविड केअर सेंटरला नव्‍याने सुरू केले असून, आता २५ कोविड केअर सेंटर रुग्‍णसेवेत असतील.
लग्‍न समारंभ, छोटे-मोठे कार्यक्रम, बाजारपेठेतील वर्दळ आणि नागरिकांचा हलगर्जीपणा यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. दिवसभरातील बाधितांचा आकडा दोनशेच्‍या पुढे जात असल्याने प्रशासनाने कोरोनाला आवरण्यासाठी कंबर कसली आहे. जिल्ह्यात सध्या सरकारी व खासगी अशी १८ कोविड रुग्‍णालये आहेत. शिवाय १३ केअर सेंटर आहेत. त्‍यात १२ ने वाढ होऊन २५ कोविड केअर सेंटर असतील. बुलडाण्यातील स्‍त्री रुग्‍णालयातही केअर सेंटर सुरू केल्याचे आरोग्‍य यंत्रणेतर्फे सांगण्यात आले.
एकट्या जानेफळमध्ये १९ रुग्‍ण
एकट्या जानेफळ गावातच कोरोनाचे १९ रुग्‍ण झाले असून, आधीच्‍या ११ रुग्‍णांत २० फेब्रुवारीला ८ रुग्‍णांची भर पडली. काल आठवडी बाजारही प्रशासनाने भरू देण्यास मनाई केली होती.
लोणारमध्ये 500 नागरिकांची केली कोरोना चाचणी
लोणारमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तहसीलदार सैफन नदाफ यांनी चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले होते. त्‍यानुसार आरोग्‍य यंत्रणेने हालचाली गतिमान करत शहरासह तालुक्‍यातील आरोग्‍य केंद्रात शिबिरे घेऊन 500 नागरिकांच्‍या कोरोना चाचण्या केल्या. यासाठी तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. किसन राठोड, वैद्यकीय अधीक्षक फिरोश शाह, डॉ. भास्‍कर मापारी, डॉ. प्रल्‍हाद जायभाये, डॉ. सानप, डॉ. यमगिर यांचे सहकार्य लाभले. या शिबिरांत 215 रॅपिड टेस्‍ट करण्यात आल्या होत्‍या. त्‍यातील ९ जण कोरोनाबाधित आढळले तर आरटीपीसीआर टेस्‍टचे 285 नमुने बुलडाणा येथील लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार श्री. नदाफ यांच्‍यासह ठाणेदार रवींद्र देशमुख यांनी केले आहे.