13 वर्षीय मुलीला फूस लावून पळवले; जळगाव जामोद तालुक्यातील घटना

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला 24 वर्षीय युवकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील वाडी बुद्रूक येथे काल, 31 डिसेंबरला घडली. मोहन भाऊराव तायडे (रा. वाडी बुद्रूक, ता. जळगाव जामोद) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मुलीच्या पित्याने जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. …
 

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला 24 वर्षीय युवकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील वाडी बुद्रूक येथे काल, 31 डिसेंबरला घडली. मोहन भाऊराव तायडे (रा. वाडी बुद्रूक, ता. जळगाव जामोद) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मुलीच्या पित्याने जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मोहन मुलीला मोटारसायकलवर बसवून घेऊन गेल्याची तक्रार त्यांनी केली आहे. तपास पोहेकाँ श्री. कुसुंबे करत आहेत.