14 रोहित्रांतील 59 लाखांच्‍या तांब्‍याच्‍या क्‍वाइलवर डल्ला!; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिंप्री गवळी (ता. खामगाव) शिवारात निर्माणाधीन असलेल्या सौर ऊर्जा निर्मिती केंद्रात जबरी चोरी झाली. चोरट्याने केंद्रातील 14 ट्रान्सफार्मरमधील तांब्याच्या क्वाईल चोरून नेल्या आहेत. एकूण एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपयांचे साहित्य लंपास झाले आहे. खामगाव तालुक्यातील चितोडा अंबिकापूर,पिंप्री गवळी शिवारात 500 एकर परिसरात सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प साकारला …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पिंप्री गवळी (ता. खामगाव) शिवारात  निर्माणाधीन असलेल्या सौर ऊर्जा निर्मिती केंद्रात जबरी चोरी झाली. चोरट्याने केंद्रातील 14 ट्रान्‍सफार्मरमधील तांब्याच्‍या क्वाईल चोरून नेल्या आहेत. एकूण एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपयांचे साहित्य लंपास झाले आहे.

खामगाव तालुक्यातील चितोडा अंबिकापूर,पिंप्री गवळी शिवारात 500 एकर परिसरात सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प साकारला जात आहे. हे काम अवादा एन. जी. प्रायव्हेट लिमिटेड क्लीन प्रोजेक्ट अंबिकापूर ही कंपनी दीड वर्षापासून करत आहे. या परिसरात 500 एकर शेतीमध्ये सोलार मोड्यूल बसवले आहेत. 16 इलेक्ट्रिकल ट्रान्‍सफार्मर बसविण्यात आले आहेत. कंपनीचे  इंजिनिअर ससवद समल (रा. ओडिसा) हे काल दुपारी काही ट्रान्‍सफार्मरमधील केबल जोडणी करण्याकरिता वेल्डरसह गेले असता त्यांना ट्रान्‍सफार्मरमधील क्‍वाइल दिसल्या नाहीत. त्यांनी इतर ट्रान्‍सफार्मर चेक केले असता त्यातील तांब्याच्या तारा सुद्धा गायब झालेल्या दिसल्या.चोरी गेलेल्या साहित्यांमध्ये 22 किलो वजनाचे 36 बस बार,1.9 किलो वजनाचे 72 बस बार,1.6 किलो वजनाचे 72 बस बारअसे एकूण 14 इलेक्‍ट्रीकल ट्रान्‍सफार्मरमधून 22 किलो वजनाचे 84 कॉपरचे बस बार,1.9 किलो वजनाचे 168 बस बार,1.6 किलो वजनाचे वजनाचे 168 बस बार असे एकूण 59,50,000 रुपयांचे तांब्याचे बस बार चोरीला गेले आहेत. याप्रकरणी कंपनीचे प्रोजेक्ट इंचार्ज अनिल कांथ यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आज, 26 मार्चला तक्रार दिली. त्‍यारून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.