14 वर्षीय मुलीचा तरुणाकडून विनयभंग; पहाटेच पोलिसांनी केली अटक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 14 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला बुलडाणा शहर पोलिसांनी अटक केली आहे. विजय नितीन लहाने (रा. बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई 18 मे रोजी दुपारी 2 च्या सुमारास चक्कीत दळण आणण्यासाठी गेली होती. याच काळात मुलगी घरासमोरील बाथरूममधून अंघोळ करून कपडे बदलण्यासाठी घरात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 14 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला बुलडाणा शहर पोलिसांनी अटक केली आहे.

विजय नितीन लहाने (रा. बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे. सूत्रांच्‍या माहितीनुसार, पीडित मुलीची आई 18 मे रोजी दुपारी 2 च्‍या सुमारास चक्‍कीत दळण आणण्यासाठी गेली होती. याच काळात मुलगी घरासमोरील बाथरूममधून अंघोळ करून कपडे बदलण्यासाठी घरात गेली असता विजयने तिला वाईट उद्देशाने कवेत घेतले. मुलीने त्‍याला हिसका देऊन स्‍वतःची सुटका केली व धावत येऊन आईला हा प्रकार सांगितले. तिच्‍या आईने विजयविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पीएसआय सुधाकर गवारगुरू, एनपीसी गंगेश पिंपळे यांनी 19 मे रोजी विजयला पहाटे 6 लाच ताब्‍यात घेतले. तपास पोलीस निरिक्षक प्रदीप साळुंखे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.