15 महिन्यांच्‍या बाळाला झालाय दुर्मिळ आजार; खर्च येणार 16 कोटी!; आई-वडिलांनी मदतीसाठी केले आवाहन..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवघ्या 15 महिन्यांच्या युवान नावाच्या बाळाला दुर्मिळातील दुर्मिळ असा आजार झाला असून, त्याच्यावर पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. स्पायनल मस्क्युलर एट्रोफी असे या आजाराचे नाव आहे. त्याच्या उपचारासाठी १६ कोटी रुपये खर्च येणार आहे. युवानची आई सौ. रुपाली रामटेककर व वडील अमित एकुलत्या एक मुलाच्या उपचारासाठी पैसे जमा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अवघ्या 15 महिन्यांच्‍या युवान नावाच्‍या बाळाला दुर्मिळातील दुर्मिळ असा आजार झाला असून, त्‍याच्‍यावर पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. स्पायनल मस्क्युलर एट्रोफी असे या आजाराचे नाव आहे. त्‍याच्‍या उपचारासाठी १६ कोटी रुपये खर्च येणार आहे. युवानची आई सौ. रुपाली रामटेककर व वडील अमित एकुलत्या एक मुलाच्या उपचारासाठी पैसे जमा करत आहेत. हे दाम्‍पत्य पुण्याचे आहे. बाळावर उपचाराची रक्कम खूप मोठी असल्याने ते मदत घेत आहोत. शक्य असेल तितकी मदत करावी, असे आवाहन त्‍यांनी केले आहे. वाएफपी फिल्मच्‍या श्रुतिका गावंडे आणि अनिकेत देशमुख यांनी या चिमुकल्यासाठी आज फेसबुक लाइव्‍ह केल्यानंतर मदतीचा मोठा ओघ सुरू झाला आहे.
खाली दिलेल्या लिंकवर आपण मदत करू शकतात…
https://www.impactguru.com/fundraiser/help-baby-yuvaan
https://milaap.org/fundraisers/support-yuvaan-ramtekkar
Google pay/phone pay and paytm number – 8237945466/7875012055