17 वर्षीय मुलीला घरासमोरील मुलाने पळवले; आईची पोलिसांत धाव!; बुलडाण्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील शांतीनगरातून 17 वर्षीय मुलगी कुणाला काही न सांगता घरातून निघून गेली आहे. तिला तिच्याच घरासमोर राहणाऱ्या तरुणाने पळवून नेल्याचा संशय मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यावरून शहर पोलीस आता या दोघांचा शोध घेत आहेत. काल, 29 जूनला सकाळी 11 च्या सुमारास ही घटना समोर आली. बेपत्ता …
 
17 वर्षीय मुलीला घरासमोरील मुलाने पळवले; आईची पोलिसांत धाव!; बुलडाण्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील शांतीनगरातून 17 वर्षीय मुलगी कुणाला काही न सांगता घरातून निघून गेली आहे. तिला तिच्‍याच घरासमोर राहणाऱ्या तरुणाने पळवून नेल्याचा संशय मुलीच्‍या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्‍यावरून शहर पोलीस आता या दोघांचा शोध घेत आहेत. काल, 29 जूनला सकाळी 11 च्‍या सुमारास ही घटना समोर आली.

बेपत्ता झालेली 17 वर्षे 5 महिन्यांची तरुणी बुलडाण्यातील आयटीआय कॉलेजमध्ये शिकते. काल सकाळपासून ती गायब झाल्याने घरच्‍यांनी तिचा शोध नातेवाइक, तिच्‍या मैत्रिणींकडे घेतला. मात्र ती मिळून आली नाही. तिच्‍या आईला माहिती मिळाली की घरासमोर राहणाऱ्याच तरुणाने तिला लग्‍नाचे आमिष दाखवून पळून नेले आहे. त्‍यामुळे तक्रारीत तिच्‍या आईने तसा उल्लेख करून मुलीला शोधून आणण्यासाठी पोलिसांना साकडे घातले आहे. तपास एपीआय श्री. पाटील करत आहेत.

दोन महिला बेपत्ता
बोराळा (ता. जळगाव जामोद) येथील 45 वर्षीय सौ. राजकन्या गौतम तायडे आणि माकोडी (ता. मोताळा ) येथील 63 वर्षीय सिंधूबाई हरी बोरले या दोन महिला बेपत्ता झाल्याची नोंद काल, 29 जूनला जळगाव जामोद आणि धामणगाव बढे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.