17 हजारांवर मतदारांची नावे वगळणारच!; सोमवारपासून टप्प्याटप्प्याने होणार कारवाई; राजकीय पक्षांना देण्यात आली माहिती

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील अभूतपूर्व व तितक्याच खळबळजनक प्रशासकीय कार्यवाहीला सोमवार, 21 जूनपासून प्रारंभ होणार आहे! मतदारसंघातील तब्बल 17 हजार 98 मतदारांची नावे टप्प्याटप्प्याने वगळण्यात येणार आहे. या कारवाईची जय्यत तयारी करण्यात आली असून, सर्व राजकीय पक्षांना याची माहिती देऊन जाणीव करून देण्यात आली आहे. थोड्या फार फरकाने …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील अभूतपूर्व व तितक्याच खळबळजनक प्रशासकीय कार्यवाहीला सोमवार, 21 जूनपासून प्रारंभ होणार आहे! मतदारसंघातील तब्बल 17 हजार 98 मतदारांची नावे टप्प्याटप्प्याने वगळण्यात येणार आहे. या कारवाईची जय्यत तयारी करण्यात आली असून, सर्व राजकीय पक्षांना याची माहिती देऊन जाणीव करून देण्यात आली आहे.

थोड्या फार फरकाने अनेक निवडणुकांचे निकाल लागत असताना जिल्ह्यातील तब्बल 29 हजार 490 मतदारांची नावे मतदार यादीमधून वगळण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. हे मतदार मूळ निवासी पत्त्यावर राहत नसल्याचे व मतदारयादीत त्यांचे फोटोच नसल्याचे बिएलओंना आढळले. यामुळे त्यांची नावेच यादीतून वगळण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. दरम्यान कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असली तरी या हजारो मतदारांना अखेरची संधी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या मतदारांनी 15 जूनपर्यंत आपला अलीकडच्या काळातील कलर फोटो बूथ लेव्हल ऑफिसरकडे वा तहसील कार्यालयात नेऊन दिला तर यादीतून हकालपट्टीची अर्थात मतदानाला मुकण्याची कारवाई टळू शकते, असे आवाहन करण्यात आले. मात्र तेव्हढीही तसदी घेण्याचे मतदारांनी टाळले! यामुळे मानवीय भूमिकेतून दिलेली ही मुदत देखील संपल्याने आता मतदार यादीतून 17 हजारांवर मतदारांची नावे “कट’ करण्याची कारवाई अटळ ठरली आहे\ दरम्यान ही नावे संकेतस्थळसहा संबंधित कार्यालयात लावण्यात आली आहे. तसेच कारवाईची माहिती राजकीय पक्षांना सुद्धा देण्यात आली आहे.

रोज 2 हजारांना मिळणार डच्चू!
दरम्यान यापूर्वी सुमारे 6 महिने संधी दिल्यावर व आताही मुदतवाढ देऊनही हे मतदार पुढे आले नाहीत. यामुळे आता बुलडाणा मतदारसंघाच्या मतदारयादीचा आकार कमी होणे क्रमप्राप्त ठरले आहे. 21 जूनपासून या प्रक्रियेला एसडीओ राजेश्वर हांडे व तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात होणार आहे. रोज कमीअधिक 2 हजार या सरासरीने ही नावे वगळण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.