क्राईम डायरीमुख्य बातम्या

19 वर्षांच्या पोराने चोरले होते फ्रिज… पोलिसांकडे झाला कबूल!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फ्रीज चोरीच्या गुन्ह्यात अमडापूर पोलिसांना हवा असणारा अक्षय राजू अवसरमोल (19, रा. सिद्धार्थनगर, चिखली) बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे. 31 जानेवारीला त्याला घरातून ताब्यात घेत विचारणा केली असता त्याने फ्रीज चोरल्याची कबुली दिली. त्याला अमडापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एलजी कंपनीचे फ्रीज चोरल्या प्रकरणी अक्षयविरुद्ध गुन्हा दाखल होता. त्याच्याकडून फ्रीज जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख बळीराम गीते यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक विजय मोरे, पोलीस उपनिरिक्षक प्रदीप आढाव, पोहेकाँ सय्यद हारुन, नापोकाँ लक्ष्मण कटक, पोकाँ संदीप मोरे, चालक पोकाँ राहुल बोर्डे यांनी पार पाडली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: