क्राईम डायरी

19 वर्षीय तरुणी घरातून निघून गेली…; देऊळघाट येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घरातून कुणाला काही न सांगता 19 वर्षीय तरुणी बाहेर पडली ती अद्याप परतलेली नाही. देऊळघाट (ता. बुलडाणा) येथे 2 मार्चला ही घटना समोर आली. तिच्‍या वडिलांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्‍याची तक्रार नोंदवली आहे.

संगिता सांडू सुसर ही तरुणी  २ मार्च रोजी दुपारी एकच्‍या सुमारास बेपत्ता झाली. घरात कोणाला काही नाही सांगता ती निघून गेली. सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु मिळून आलीच नाही. रंग गोरा, लांब केस, सडपातळ बांधा, अंगात टॉप घातलेला, काळी लेगीज, पायात सॅन्डल असे तिचे वर्णन असून, ती कोठे आढळल्यास बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तपास पो.हे.काँ. सुभाष चोपडे करित आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: