क्राईम डायरीमुख्य बातम्या

19 वर्षीय मुलाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवले; खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 19 वर्षीय मुलाने गावातीलच 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला  फूस लावून पळवून नेले. ही घटना आंबेटाकळी (ता. खामगाव) येथे घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, त्‍या पती, 2 मुली व 1 मुलासह आंबेटाकळी येथील मनीष घटे यांच्या विटभट्टीवर मजुरी करतात व तिथेच राहतात. तिथेच मालकाचा पुतण्या अक्षय गणेश घटे (19) व 17 वर्षीय मुलीची ओळख झाली. तो नेहमी मुलीवर लक्ष ठेवून होता. नेहमी तिच्यासोबत गोड गोड बोलायचा. मात्र मालकाचा पुतण्या असल्याने आम्ही काही बोललो नाही, असे मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. काल अक्षयने दुपारी चारच्‍या सुमारास अल्पवयीन मुलीला पळवून नेले. आई- वडिलांनी शोध घेऊनही दोघे मिळून न आल्याने मुलीच्या आईने आज हिवरखेड पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अक्षय घेटेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: