2 बळींची भर, आकडा @ 222… बाधितांची एकूण संख्याही 26 हजार पार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 16 मार्चला कोरोनाने 2 बळी घेतले असून, उपचारादरम्यान सिद्धार्थनगर चिखली येथील 65 वर्षीय महिला व गोपालनगर, खामगाव येथील 78 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, एकूण बाधितांचा आकडा 26 हजार पार गेला असून, दिवसभरात नवे 567 बाधितांची नव्याने भर पडली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः  जिल्ह्यात आज, 16 मार्चला कोरोनाने 2 बळी घेतले असून, उपचारादरम्यान सिद्धार्थनगर चिखली येथील 65 वर्षीय महिला व गोपालनगर, खामगाव येथील 78 वर्षीय महिला रुग्‍णाचा मृत्यू झाला आहे. दरम्‍यान, एकूण बाधितांचा आकडा 26 हजार पार गेला असून,   दिवसभरात नवे 567 बाधितांची नव्‍याने भर पडली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2831 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2264 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 567 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 359 व रॅपीड टेस्टमधील 208 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 701 तर रॅपिड टेस्टमधील 1563 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 71, बुलडाणा तालुका : करडी 4, सागवन 1, सुंदरखेड 4, दुधा 8, कुंबेफळ 1, ढालसावंगी 1, धाड 6, वालसावंगी 1, कोलवड 1, उबाळखेड 1,  चिखली शहर : 32, चिखली तालुका : वैरागड 1, खैरव 2, सातगाव भुसारी 1, शेलगाव जहा 1, दहीगाव 1,  किन्होळा 1,  मंगरूळ नवघरे 1, उंद्री 1, नागणगाव 1,  खंडाळा 1, गांगलगाव 4, मोताळा शहर : 4, मोताळा तालुका : डिडोळा 1, तारापूर 3,  निपाणा 2, आव्हा 1, शेलगाव बाजार 2, लोणार शहर : 3, लोणार तालुका : हिरडव 1, सुलतानपूर 8, पळसखेड 1,  संग्रामपूर तालुका : वानखेड 5, मनार्डी 2, शेवगा 2, हिंगणा 11, बाभुळखेड 1, खामगाव शहर : 108, खामगाव तालुका : लाखनवाडा 2, सुटाळा 4, काक्ता 1, टेंभुर्णा 1, गोंधनपूर 1, आवार 1, पिंप्री गवळी 2, पिंपळगाव राजा 1, शिरसगाव दे. 1, हिवरखेड 1, शेलोडी 14, शिर्ला नेमाने 1, पोरज 1, हिवरा बुद्रूक 2,  नांदुरा शहर : 23, नांदुरा तालुका : शेंबा 2, जवळा बाजार 1,  वळती 1, पिंप्री अढाव 1, पातोंडा 1, निमगाव 1, टाकरखेड 2, खैरा 1,  निमखेड 1, बरफगाव 1, मलकापूर शहर : 23 , मलकापूर तालुका : दाताळा 2,लोणवडी 1, देऊळगाव राजा शहर : 40, देऊळगाव राजा तालुका : सिनगाव जहा. 5, डोढ्रा 2,  चिंचोली बुरूकुल 1, सावंगी टेकाळे 1, गिरोली 1, पांग्री 1, जळगाव जामोद शहर : 8, जळगाव जामोद तालुका : बोराळा बुद्रूक 5, बोराळा खुर्द 4,  कजेगाव 4, पळशी सुपो 7, सुनगाव 1, मेहकर शहर : 25, मेहकर तालुका : नायगाव दत्तापूर 4, सावंगी माळी 2, सारंगपूर 7, कनका 1, पांग्री काटे 1, मादनी 1, महागाव 1, अंजनी बुद्रूक 1, कळमेश्वर 2, जानेफळ 2, चिंचोली बोरे 1, खळेगाव 2, डोणगाव 1,  सिंदखेड राजा शहर : 10, सिंदखेड राजा तालुका : सावखेड तेजन 1, आडगाव राजा 4, ताडेगाव 1, साखरखेर्डा 8, उमरद 2, दत्तापूर 1,  शेगाव शहर : 7, शेगाव तालुका : लासुरा 1, जलंब 1, पहुरजिरा 1,  मूळ पत्ता असोला ता. रिसोड 1, फत्तेपूर जि. जळगाव 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 567 रूग्ण आढळले आहेत.

514 रुग्‍णांची कोरोनावर मात

आज 514 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः चिखली : 117, खामगाव : 69, बुलडाणा : सिद्धीविनायक हॉस्पीटल 7, आशीर्वाद हॉस्पीटल 4, सहयोग हॉस्पीटल 3, कोविड रुग्णालय 5, मुलींचे वसतिगृह 8, अपंग विद्यालय 13, देऊळगाव राजा : 37, मेहकर : 13, जळगाव जामोद : 29, सिंदखेड राजा : 31, नांदुरा : 43, मलकापूर : 91, शेगाव : 31, मोताळा : 12, संग्रामपूर : 6, लोणार : 2.

3629 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू

आजपर्यंत 162856 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 22379 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 3505 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 26230 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्‍णालयात 3629 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. आजपर्यंत 222 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.