2 लाखांसाठी विवाहितेचा मांडला छळ; पतीविरुद्ध गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माहेरवरून 2 लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी आज, 10 मे रोजी गुन्हा दाखल केला. सौ. नंदाबाई राजू गायकवाड (रा. मासरूळ, ता. बुलडाणा. ह. मु. माळविहिर, ता. बुलडाणा) यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यात म्हटले आहे, की माझे लग्न …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः माहेरवरून 2 लाख रुपये घेऊन ये, असे म्‍हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी आज, 10 मे रोजी गुन्‍हा दाखल केला.

सौ. नंदाबाई राजू गायकवाड (रा. मासरूळ, ता. बुलडाणा. ह. मु. माळविहिर, ता. बुलडाणा) यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्‍यात म्‍हटले आहे, की माझे लग्न राजू काशिनाथ गायकवाड (रा. मासरुळ) यांच्‍यासोबत 28 मे 2002 रोजी माळविहीर येथे झाले. त्यांच्‍यापासून मला 18 वर्षांची मुलगी आहे व 16 वर्षांचा मुलगा आहे. त्यांनी सुरुवातीचे दोन वर्षे चांगले वागवले. त्यानंतर पतीसोबत पुणे येथे राहायला गेली. तेथे ती सतत दारू पिऊन नशेत राहू लागले. नशेत लहान सहान कारणावरून मारहाण करू लागले. चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करू लागले. त्‍यानंतर पतीचे काम सुटल्‍याने आम्ही परत मासरुळ येथे राहायला आलो. तेथे दोन वर्षे राहिलो परंतु त्यांच्‍या वागणुकीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर सण 2015 मध्ये माझे पती आणि मुलाबाळांसह सुंदरखेड येथे राजेद्र लोखंडे यांच्‍या खोलीत भाड्याने राहायला आलो. तेथे सुद्धा पती काही ना काही कारणावरून भांडण करत होते. तुझ्या आई-वडिलांकडून प्लॉट घेण्यासाठी 2 लाख रुपये आण म्हणून भांडण करत होते. 31 डिसेंबर 2020 रोजी त्‍यांनी मला व मुलांना शिविगाळ करून मारहाण केली. जीवे मरण्याची धमकी दिली. त्‍यामुळे मी माझ्या मुलासह माहेरी माळविहीर येथे निघून गेले होते. पतीच्‍या त्रासामुळे माझ्या मुलासह गेल्या 5 महिन्‍यांपासून माहेरी राहत आहे. त्‍यांनी माझ्या आई- वडील, काकांनाही मारहाण केली. आपसात समझोता होण्यासाठी महिला तक्रार निवारण कक्षात तक्रार केली होती. परंतु समझोता झाला नाही, असेही त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले आहे. पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला असून, तपास एएसआय नामदेव खवले करत आहेत.