2 वाहनांसह 7 क्विंटल गांजा जप्त, 1 कोटी 10 लाखांचा मुद्देमाल ; एक आरोपी ताब्यात, तिघे फरार

मलकापूर (गजानन ठोसर ःबुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः मलकापूर ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीत 7 क्विंटल गांजा व 2 महागडी वाहने असा 1 कोटी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आज, 9 मार्चला पहाटे 3 च्या सुमारास केलेल्या या कारवाईत एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तिघे जण मात्र फरार होण्यात यशस्वी ठरले. …
 

मलकापूर (गजानन ठोसर ःबुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः  मलकापूर ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीत  7 क्विंटल गांजा व 2 महागडी वाहने असा 1 कोटी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आज, 9 मार्चला पहाटे 3 च्‍या सुमारास केलेल्या या कारवाईत एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी तिघे जण मात्र फरार होण्यात यशस्वी ठरले.

ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी पथकासह ग्रामीण भागात पेट्रोलिंग करीत  होते. यादरम्यान मलकापूर ते जांबुळधाबा रोडवर हॉटेल टी पॉईंटजवळ पहाटे तीन वाजेच्या सुमारास  नाकाबंदी दरम्यान मलकापूरहून बोदवडकडे भरधाव येणाऱ्या दोन गाड्यांना पोलिसांनी अडविले . गाड्या थांबविताच  दोन्ही वाहनांतील चार जण उतरून पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. एकाला पोलिसांनी पकडले असून, त्यांच्या ताब्यातील इर्टिका (क्रमांक TS 27 C 0956), इनोव्हा (क्रमांक AP 28 TC 6255) या दोन्ही गाड्यांतून सुमारे सात क्विंटल गांजा किंमत अंदाजे सत्तर लाख रुपये, इनोव्हा, इर्टिका किंमत अंदाजे चाळीस लाख रुपये असा एकूण एक कोटी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल  जप्त केला. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंदकुमार चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तायडे, पो.हे.काँ. सचिन दासर, पो.ना.दिलीप तडवी, राहुल बटूकार, रविकांत बावस्कर, सहाय्यक फौजदार बाळू टाकरखेडे, पो. कॉ. दिपक नाफडे आदींनी केली.