क्राईम डायरीमुख्य बातम्या

20 वर्षीय विवाहित तरुणी दीड वर्षीय चिमुकल्यासह गायब!; मलकापुरातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 20 वर्षीय विवाहित तरुणी आपल्या दीड वर्षीय मुलासह गायब झाल्याची घटना मलकापूरमध्ये समोर आली आहे. आजवर शोध न लागल्याने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तिच्या भावाने तक्रार दिली आहे.

सौ. संगिता भारत बामले (20, रा. आझादनगर, सुरत, गुजरात) ही 5 महिन्‍यांपासून आई-वडिलांकडे मलकापूरला रोहिदासनगरात तिच्या दीड वर्षीय मुलासह राहत होती. गेल्या महिन्यात 7 फेब्रुवारीला ती गायब झाली. आजवर तिचा सगळीकडे शोध घेऊन ती मिळून आली नाही. अखेर हरवल्याची तक्रार देण्यात आली. रंग सावळा, उंची 5 फूट, बांधा मजबूत, चेहरा गोल, केस काळे लांब, अंगाल लाल पंजाबी ड्रेस, पायात चप्पल असे तिचे वर्णन असून, सोबत मुलगा अंकुश भारत बामले वय दीड वर्षे, रंग सावळा, चेहरा गोल, केस काळे, लाल टी-शर्ट, निळी जिन्स अशा वर्णनाचे महिला-मूल कुठे आढळल्‍यास मलकापूर शहर पोलीस ठाण्याला 07262-221018 या क्रमांकावर  किंवा पोलीस निरिक्षक प्रल्हाद काटकर यांच्‍याशी 9764330900 या मोबाइलवर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: