20 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन घरात आत्‍महत्‍या

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 20 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रोहणा (ता. खामगाव) येथे आज, 31 मे रोजी सकाळी 11 च्या सुमारास समोर आली.मीनाक्षी उत्तम सवंग असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा भाऊ मिलिंदने खामगाव ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. मिलिंद हा पत्नीसह सासरवाडीला माक्ता येथे …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 20 वर्षीय तरुणीने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना रोहणा (ता. खामगाव) येथे आज, 31 मे रोजी सकाळी 11 च्‍या सुमारास समोर आली.
मीनाक्षी उत्तम सवंग असे आत्‍महत्‍या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा भाऊ मिलिंदने खामगाव ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. मिलिंद हा पत्‍नीसह सासरवाडीला माक्‍ता येथे गेला होता. आज सकाळी शेजारी राहणाऱ्या रोषण सावंग याने त्‍यांना फोन करून मीनाक्षीने घरात दोरीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची माहिती दिली. त्‍यामुळे मिलिंदने तातडीने रोहणा गाव गाठले. पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पोहेकाँ शेख हमीद करत आहेत. आत्‍महत्‍येचे कारण वृत्त लिहिपर्यंत समोर आले नव्‍हते.