20 लाखांची लॉटरी लागली होती, त्याच दिवशी अपघातात मृत्यू… जावयाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी सासर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जावयाचा घातपात करणार्यांना अटक करा आणि तपासात हलगर्जीपणा करणार्या लोणार येथील ठाणेदारांना निलंबित करा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सासर्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना काल, 1 जानेवारी रोजी सायंकाळी घडली. बंदोबस्तावर हजर असणार्या पोलिसांनी आत्मदहनाचा प्रयत्न करणार्याला वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. संजय बाच्छिरे (रा. काटेनगर, ता. लोणार) …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जावयाचा घातपात करणार्‍यांना अटक करा आणि तपासात हलगर्जीपणा करणार्‍या लोणार येथील ठाणेदारांना निलंबित करा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सासर्‍याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना काल, 1 जानेवारी रोजी सायंकाळी घडली. बंदोबस्तावर हजर असणार्‍या पोलिसांनी आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍याला वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

संजय बाच्छिरे (रा. काटेनगर, ता. लोणार) असे ताब्यात घेतलेल्या सासर्‍याचे नाव आहे.बाच्छिरे यांचे जावई अमोल अशोक डोंगरे (29, रा. भीमगर, लोणार) हे हिरडव येथे ऑनलाइन मटका चक्री जुगाराची पट्टी घेण्याचे काम करत होते. त्यांना जुगार खेळण्याचाही छंद होता. त्यांना 20 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे त्यांनी 24 नोव्हेंबरला कुटुंबियांना सांगितले होते. मात्र त्याच दिवशी रात्री त्यांचा पालखेड फाट्यावर अपघात झाला होता. गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. अमोल डोंगरे यांच्या अंगावर मारहाणीच्या जखमा होत्या. त्यामुळे त्यांचा अपघात नसून पैशांसाठी त्याचा घात करण्यात आल्याचा आरोप संजय बाच्छिरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केला होता. लोणार पोलीस याप्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने संजय बाच्छिरे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतले.याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.