20 वर्षांचा मुलगा साडेचौदा वर्षांची मुलगी; वरूडला लागणार होता बालविवाह! जिल्ह्यात 15 दिवसांत रोखले 5 बालविवाह!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 20 वर्षीय मुलगा आणि साडेचौदा वर्षांची मुलगी यांचा काल, 19 एप्रिलला वरुड (ता. बुलडाणा) येथे होणारा बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखला. मुलगा वरूडचा तर मुलगी अजिंठ्याची आहे. या बालविवाहाची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला विवाहाच्या 1 तास आधी मिळाली होती. तरीही तातडीने हालचाली करत विवाह थांबविण्यात आला. वरूड येथील …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 20 वर्षीय मुलगा आणि साडेचौदा वर्षांची मुलगी यांचा काल, 19 एप्रिलला वरुड (ता. बुलडाणा) येथे होणारा बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखला.

मुलगा वरूडचा तर मुलगी अजिंठ्याची आहे. या बालविवाहाची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला विवाहाच्या 1 तास आधी मिळाली होती. तरीही तातडीने हालचाली करत विवाह थांबविण्यात आला. वरूड येथील सरपंच शिला अमोल बुरजे, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंध अधिकारी संदीप शिंदे, पोलिस पाटील संजय पाटील, अंगणवाडी सेविका तथा सदस्य सचिव ग्राम बाल संरक्षण समिती श्रीमती वंदना जाधव यांनी  बालकांच्या पालकांना समज दिली. बाल विवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे स्पष्ट करत अशा गुन्ह्यात सामील असणाऱ्यांना 2 वर्षे कारावास आणि आर्थिक दंड होऊ शकतो, असे मुला-मुलीच्‍या पालकांना सांगितले. विवाहानंतर होणाऱ्या दुष्परिणामांचीही माहितीही त्‍यांच्‍या कुटुंबियांना देण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक मारवाडी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण अधिकारी सागर राऊत, सामजिक कार्यकर्ते मोहन बावणे व प्रदीप सपकाळ, क्षेत्र कार्यकर्ता नीलेश चौथनकर व धाड पोलिस स्टेशनचे पोहेकाँ सावळे यांनी यासाठी पुढाकार घेतला. बालकांना पुढील कायदेशीर समुपदेशन व पुनर्वसनासाठी बाल कल्याण समितीच्‍या समक्ष आज, 20 एप्रिलला हजर करण्यात आले. 17 एप्रिल रोजी देऊळगाव घुबे येथेही बालविवाह रोखण्यात आला होता. जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत 5 बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी दिली.