21 वर्षाच्या तरुणाने 16 वर्षीय मुलीस पळवले; चिखली तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 21 वर्षीय तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना चिखली तालुक्यातील कवठळ येथे समोर आली आहे.याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांच्या गावातीलच शुभम अभिमन्यू वाघमारे याने त्यांच्या मुलीला 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:30 च्या सुमारास पळवून नेले. रात्रभर त्यांचा शोध घेऊनही न सापडल्याने आज पोलीस …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 21 वर्षीय तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना चिखली तालुक्यातील कवठळ येथे समोर आली आहे.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांच्या गावातीलच शुभम अभिमन्यू वाघमारे याने त्यांच्या मुलीला 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:30 च्या सुमारास पळवून नेले. रात्रभर त्यांचा शोध घेऊनही न सापडल्याने आज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शुभम वाघमारे विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.