22 हायमास्‍टनी उजळणार चिखली!; आमदार श्वेताताई महाले यांचा पुढाकार

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः चिखली विधानसभा मतदारसंघात विकासाचे पर्व सुरू झाले असून, आमदार श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांतून कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना मान्यता मिळालेली आहे. लवकरच चिखली विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा चिखली अर्बन बँकचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी केले. आमदार श्वेताताई महाले यांच्या आमदार निधीमधून चिखली शहरात मंजूर करण्यात …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः चिखली विधानसभा मतदारसंघात विकासाचे पर्व सुरू झाले असून, आमदार श्वेताताई महाले यांच्या प्रयत्‍नांतून कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना मान्यता मिळालेली आहे. लवकरच चिखली विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे ज्‍येष्ठ नेते तथा चिखली अर्बन बँकचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी केले.

आमदार श्वेताताई महाले यांच्या आमदार निधीमधून चिखली शहरात मंजूर करण्यात आलेल्या हायमास्टच्‍या भूमिपूजन प्रसंगी ते काल, 22 एप्रिलला बोलत होते. श्वेताताईंनी कार्यकर्त्यांच्‍या हातून भूमिपूजन करवून सन्मान वाढवला आहे, असेही श्री. गुप्‍त म्‍हणाले. आमदार सौ. महाले पाटील यांच्या आमदार निधीमधून चिखली शहरात २४ ठिकाणी हायमास्ट बसविण्यात येत असून, या कामाचा शुभारंभ सतीश गुप्त यांच्या हस्ते झाला. यावेळी चिखली पंचायत समिती सभापती सौ. सिंधूताई तायडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक पंडितराव देशमुख, नगरसेवक गोविंद देव्हडे, शैलेश बाहेती, सुदर्शन खरात, सतीश खबुतरे, नामू गुरुदासानी, सुभाषआप्पा झगडे, पंजाबराव धनवे पाटील ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष काळे पाटील, संजय आतार,तालुका प्रसिद्धी प्रमुख सिद्धेश्वर ठेंग, सचिन शेटे, किरण पवार, स्वीय सहायक सुरेश इंगळे, अक्षय भालेराव, कैलास सपकाळ, रवींद्र वानखेडे  उपस्थित होते. राऊतवाडी येथून या कामास सुरुवात झाली.

इथे बसवणार हायमास्ट

चिखली शहरात २४ ठिकाणी हायमस्ट बसविले जाणार आहेत. यात अण्णाभाऊ साठे चौक, खंडाळा रोड गजानन महाराज मंदिर, गांधीनगर हनुमान मंदिर, गोपाल किराणा, आदर्श शाळा, गोरक्षणवाडी, चर्चच्या मागे सचिन महाराज यांच्या घराजवळ, चावडी जवळ, जिजाऊ नगर गणपती मंदिर, जुनागाव स्मशानभूमी ,देवी मंदिर परिसर, नगरपालिका नूर चौक, बसवेश्वर चौक, बाजार समितीजवळ, बारभाई मोहल्ला, बैलजोडी, माळीपुरा कालिंका देवी मंदिर, राऊतवाडी स्टॉप, वडर वाडी, विर सावरकर पुतळ्याजवळ, शाहूनगर, सरकारी दवाखान्याजवळ स्मशानभूमी येथे, सिंधी कॉलनी ओपन स्पेस येथे, राऊतवाडी स्मशानभूमी तथा सैलानी नगरच्या विद्युत कार्यालय चौक हायमास्‍टने उजळणार आहे. भविष्यात चिखली शहरातील सर्व चौकांमध्ये हायमास्ट बसवून चिखली शहराला उजळविण्याचा प्रयत्न आमदार श्वेताताई महाले यांच्याकडून होणार आहे.