बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

24 तासांत जिल्ह्यात 214 मि.मी. पावसाची हजेरी; चिखली, खामगावमध्ये मुसळधार, पेरण्यांची लगबग

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : जिल्ह्यात रोहिणी व मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर हजेरी लावणाऱ्या पावसाने आज, 9 जूनला सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत 214 मि.मी. इतकी हजेरी लावली. चिखली व खामगावमध्ये दमदार हजेरी लावणाऱ्या वरुणराजाने इतरत्र संमिश्र हजेरी लावली.

25 मेपासून सुरू झालेल्या रोहिणी व 7 जूनपासून सुरू झालेल्या मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावली. जवळपास रोज हजेरी लावत असल्याने आजअखेर जिल्ह्यात 450 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गत्‌ 24 तासांत जिल्ह्यात 214 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. चिखली 40 मि.मी. व खामगाव 35.2 मि.मी. इतकी या तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. सिंदखेडराजा 23, लोणार 21, मेहकर 31, बुलडाणा 8.2 मि.मी., मलकापूर 15 नांदुरा 21.6 मि.मी.,जळगाव जामोद 9.8, मोताळा तालुक्यात 6. 3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पेरण्यांची लगबग
दरम्यान पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने जिल्ह्यात खरीप पीक पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यातील खरीप पिकाखालील क्षेत्र 7 लाख 40 हेक्टर इतके आहे. यात सोयाबीनचा पेरा पावणेचार लाख तर कपाशीचा पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत जातो. यामुळे लाखो कास्तकारांनी पेरणीची तयारी सुरू केली असून कृषी सेवा केंद्र गजबजलेली दिसून येत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: