बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

24 तासांत 619 कोरोना पॉझिटिव्ह ; चौघांचे मृत्यू! बुलडाणा आघाडीवरच; संग्रामपूरात निघाले 56 रुग्ण!! 4 तालुक्यांतील उद्रेक कायम

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मागील 3 दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍णांची संख्या सहाशेच्या आसपासच येत असल्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणा सुखावल्याचे चित्र आहे. गत 24 तासांत 619 बाधित रुग्ण आढळले असून, 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बुलडाण्यातील स्फोटक स्थिती कायम असतानाच संग्रामपूरमध्ये दीर्घ काळानंतर 56 रुग्ण निघाले ही आजची मोठी बातमी ठरली आहे. याशिवाय 4 तालुक्यांतील कोविडचा उद्रेक टिकून असल्याचे दिसून आले.

6073 नमुने संकलन व 5426 अहवाल प्राप्त अशा स्थितीत सलग चौथ्या दिवशी सहाशेच्या आसपास पॉझिटिव्ह निघणे यंत्रणेसाठी मोठा दिलासा ठरत आहे. मात्र लॉकडाऊनला कंटाळलेल्या व्यापारी, मजूर व सर्वसामान्यांना हा दिलासा मानवत नसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे बुलडाणा तालुका 136 रुग्णांसह जिल्ह्यातील आघाडी टिकवून आहे. खामगाव 71 रुग्णासह त्याच्यापासून ’65 गज की दुरी ‘ ठेऊन आहे. अनेक दिवसांपासून दहापेक्षा कमी रुग्ण असणाऱ्या संग्रामपूर तालुक्यात गत 24 तासांत 56 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय लोणार 51, नांदुरा 51, देऊळगावराजा 59, मलकापूर व शेगाव प्रत्येकी 38, मेहकर 35, मोताळा 32  या तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक व सातत्य कायम असल्याचे स्पष्ट होते. या तुलनेत जळगाव जामोद 8 व सिंदखेडराजा 13 या तालुक्यांतील रुग्ण संख्या कमी असणे दिलासा मानावा काय? हा आजचा सवाल आहे. याचा जवाब उद्याच्या अहवालात दडलंय , हे सांगायला आता तज्ञाची गरज उरली नाहीये!

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: