24 जानेवारीला ओबीसी महारॅली; सिंदखेडराजातून जाणार जालन्याला

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओबीसी महारॅली 24 जानेवारीला निघणार आहे. यात 200 दुचाकी, 100 चारचाकी वाहनांचा ताफा असेल. देऊळगावराजा येथून सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून देऊळगावराजा शहरात फिरून सिंदखेडराजाला प्रस्थान करेल. सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांना सकाळी 10 वाजता अभिवादन करून रॅली जालन्याकडे प्रस्थान …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओबीसी महारॅली 24 जानेवारीला निघणार आहे. यात 200 दुचाकी, 100 चारचाकी वाहनांचा ताफा असेल. देऊळगावराजा येथून सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून देऊळगावराजा शहरात फिरून सिंदखेडराजाला प्रस्थान करेल. सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांना सकाळी 10 वाजता अभिवादन करून रॅली जालन्याकडे प्रस्थान करेल.