24 तासांचा दिलासा? आज 506 पॉझिटिव्ह! मलकापूर सव्वाशेच्या पल्याड!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गत् आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने दोनदा 800 चा आकडा ओलांडल्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणा हादरल्या! मात्र चालू आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज 22 मार्चला बाधितांचा आकडा 506 इतका आल्याने यंत्रणांनी सुटकेचा श्वास सोडला!! मात्र हा दिलासा 24 तासांपुरता मर्यादित तर राहणार नाही ना अशी यंत्रणातील धाकधूक …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गत्‌ आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍णांच्या संख्येने दोनदा 800 चा आकडा ओलांडल्याने प्रशासन व आरोग्य यंत्रणा हादरल्या! मात्र चालू आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज 22 मार्चला बाधितांचा आकडा 506 इतका आल्याने यंत्रणांनी सुटकेचा श्वास सोडला!! मात्र हा दिलासा 24 तासांपुरता मर्यादित तर राहणार नाही ना अशी यंत्रणातील धाकधूक कायम आहे.

मागील आठवड्यात कोरोनाचा प्रकोप कायम राहिला. त्यातच त्याने दोनदा धोक्याची पातळी व 800 चा आकडा ओलांडला. यामुळे  विकेंडपर्यंत यंत्रणा हादरलेल्याच राहिल्या! त्या तुलनेत नवीन आठवड्याची सुरुवात शांत राहिली. परवा 185 पर्यंत पोहोचलेला बुलडाणा तालुका 77 वर येणे हा काहीसा दिलासच ठरलाय! मात्र सर्वच चित्र दिलासादायक आहे असे नाही. मलकापूरमधील वाढ कायम असून गत 24 तासांत 126 रुग्ण निघणे धोक्याची घंटी मानली  जात आहे.

खामगावची सेंच्युरी (98 रुग्ण) हुकली. मात्र आकडा लहान नाहीये सिंदखेड राजा 45, जळगाव जामोद 36, शेगाव 44 मधील सरासरी कायम आहे. या तुलनेत चिखली 25, मेहकर 8, नांदुरा 12, लोणार 14, देऊळगावराजा 12 या तालुक्यांतील संख्या आटोक्यात आहे. विकासामध्ये जिल्ह्यात तळाशी असलेल्या संग्रामपूर तालुक्याचे कोरोनामध्ये तळाशी राहणे मोठा दिलासा आहे. मात्र हे सर्व दिलासे उद्यापर्यंत तरी कायम राहतात काय!? या प्रश्नाचे उत्तर उद्याच्या अहवालात दडलंय, यामुळे हे दिलासे 24 तासांपुरते मर्यादित देखील ठरू शकतात.