24 तासांत कोरोनाचे 5 बळी!! आज 634 नव्‍या बाधितांची भर

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी)ः विकेंडमुळे स्वॅब नमुने संकलन व चाचण्यांमध्ये घट झाल्याने रुग्ण संख्येतही घट आली. परिणामी आज 5 एप्रिलला जिल्ह्यात 634 कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली. हा तांत्रिक दिलासा कुचकामी असताना गत् 24 तासांत 5 रुग्ण दगावल्याने आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत. आठवड्याअखेर नमुने संकलनात घट झाली. यातही रॅपिड( 1723) च्या तुलनेत आरटीपीसीआर (490) ची संख्या खूपच …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी)ः  विकेंडमुळे स्वॅब नमुने संकलन व चाचण्यांमध्ये घट झाल्याने रुग्ण संख्येतही घट आली. परिणामी आज 5 एप्रिलला जिल्ह्यात 634 कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली. हा  तांत्रिक दिलासा कुचकामी असताना गत्‌ 24 तासांत 5 रुग्ण दगावल्याने आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत.

आठवड्याअखेर नमुने संकलनात घट झाली. यातही रॅपिड( 1723) च्या तुलनेत आरटीपीसीआर (490) ची संख्या खूपच कमी आहे. परिणामी यातील व प्रलंबित मिळून 2807 इतकेच अहवाल प्राप्त झाले. यातील 2144 निगेटिव्ह आलेत. मागील दोन दिवसांत अनुक्रमे 929 आणि 1022पॉझिटिव्ह असे भयावह आकडे आले होते. यातुलनेत आज 634 रुग्णसंख्या आहे. अर्थात यातही 105 रुग्णांसह बुलडाणा तालुका आघाडीवर आहे. लोणार 98, लोणार 98, नांदुरा 92, सिंदखेडराजा 73, देऊळगाव राजा 50, खामगाव 48, चिखली 47 या तालुक्यांनी आपल्यापरीने यात भर घातलीय! या तुलनेत संग्रामपूर 20, मलकापूर 7, मोताळा 8, शेगाव 5 ,जळगाव 1 या तालुक्यांतील संख्या किमान आज तरी नियंत्रणात आहे.

दरम्यान, गत 24 तासांत कोरोनाने 5 बळी घेतले आहेत. बुलडाण्यातील महिला रुग्णालयातील 3 रुग्णांचा मृत्यू झाला. सिंदखेडराजा येथील जिजाऊ हॉस्पिटल तर मलकापूर उप जिल्हा रुग्णालयातील प्रत्येकी एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.