बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

29 वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्‍यू झाल्‍याने धक्का!; दिवसभरात 5 बळी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 25 मार्चला कोरोनाने 5 बळी घेतले असून, यात 29 वर्षीय तरुणाचा समावेश असल्याने मोठा धक्का मानला जात आहे. उपचारादरम्यान नांदुरा येथील 49 वर्षीय पुरुष, पुंडलिकनगर चिखली येथील 76 वर्षीय महिला, अंढेरा (ता. देऊळगाव राजा) येथील 29 वर्षीय पुरुष, शेलगाव बाजार (ता. मोताळा) येथील 82 वर्षीय पुरुष व खामगाव येथील 70 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्‍यान, दिवसभरात नवे 773 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळले असून, 802 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4989 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 773 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 514 व रॅपीड टेस्टमधील 259 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 740 तर रॅपिड टेस्टमधील 3476 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

खामगाव शहर : 59, खामगाव तालुका : बोरजवळा 1, आडगाव 1, पिंप्री गवळी 2, गारडगाव 1, सुटाळा बुद्रूक 5, टेंभुर्णा 6, पिंप्री देशमुख 1, पिंपळगाव राजा 5, जळका 2, भालेगाव 1, लोणार शहर : 15, लोणार तालुका : पुहर 1, बिबी 5, देऊळगाव 6, खळेगाव 6, शिवणी पिसा 3, पिंपळनेर 2, मातमळ 2, सुलतानपूर 2, शारा 3, कारेगाव 18, खुरमपूर 1, वढव 1, मोताळा शहर : 17, मोताळा तालुका : पुन्हई 1, तरोडा 1, चिंचपूर 1, आव्हा 1, राहेरा 3, गुळभेली 3, सावरगाव 1, रोहिणखेड 1, थळ 2, शिरवा 1, तपोवन 1, शेलापूर खुर्द 1, राजूर 1, पिंपळगाव देवी 2, डिडोळा 1, बोराखेडी 2, परडा 3, पान्हेरा 1, धामणगाव बढे 2, सारोळा पीर 1, निपाणा 2, दाभाडी 1, मलकापूर शहर : 59, मलकापूर तालुका : बेलाड 1, घिर्णी 1, नरवेल 2, वडजी 1, खामखेड 1, पिंपळखुटा 2, निमखेड 1, देवधाबा 2, विवरा 2, धरणगाव 1, चिखली शहर : 37, चिखली तालुका : कोलारा 2, मालगणी 1, चंदनपूर 2, गोद्री 1, किन्होळा 5, टाकरखेड 1, शेलगाव आटोळ 1, शेलूद 1, मुंदेफळ 1, भालगाव 1, हातणी 1, पिंप्री आंधळे 1, खामखेड 1, शेलसूर 1, अन्वी 1, मोहाडी 1, केळवद 3, मेहकर शहर : 26, मेहकर तालुका : डोणगाव 1, नायगाव देशमुख 7, वडजीसीम 2, जयताळा 1, देऊळगाव माळी 2, मोहाडी 1, कंभोळा 2, परतापूर 1, सोनार गव्हाण 4, मोळा 1, मिर्झापूर 1, अंजनी 7, लोणी गवळी 1, शेलगाव 1, हिवरा आश्रम 4, बुलडाणा शहर : 70, बुलडाणा तालुका : धाड 5, सागवन 2, रूईखेड 1, डोमरूळ 1, नांद्राकोळी 2, माळवंडी 1, दहीद खुर्द 1, रायपूर 2, माळविहीर 1, दत्तपूर 4, मासरूळ 2, माळवंडी 1, देऊळघाट 1, कोलवड 1, संग्रामपूर शहर : 2, संग्रामपूर तालुका : टुनकी 4, झाशी पळशी 2, बोडखा 1, चौंढी 1, शेगाव शहर : 45, शेगाव तालुका : टाकळी विरो 1, झाडेगाव 1, जवळा 1, सिंदखेड राजा शहर : 9, सिंदखेड राजा तालुका : खैरखेड 1, भोसा 2, केशव शिवणी 1, किनगाव राजा 3, गुंज 4, बाळसमुद्र 2, शिंदी 1, सावंगी माळी 1, सवडत 1, हिवरा गडलिंग 1, झोटींगा 2, वाघोळा 1, साखरखेर्डा 6, वर्दडी 1, चंदनपूर 1, जांभोरा 2, सावखेड तेजन 1, काकड चिकना 1, धंदरवाडी 1, हनवतखेड 1, पिंपळखेड बुद्रूक 1, देऊळगाव राजा शहर : 31, देऊळगाव राजा तालुका : तुळजापूर 1, भिवगाव 1, सावखेड भोई 1, सिनगाव जहाँगिर 1, गोंधनखेड 1, अंभोरा 2, खल्याळ गव्हाण 3, सुरा 2, बायगाव बुद्रूक 3, देऊळगाव मही 4, नागणगाव 2, डोढ्रा 1, निमखेड 2, डोईफोडेवाडी 1, पळसखेड 2, सरंबा 2, मेंडगाव 1, गारखेड 2, वाकी 1, जवळखेड 1, चिंचखेड 1, आळंद 1, वाघजई 2, नांदुरा शहर : 64, नांदुरा तालुका : रामपूर 1, धानोरा 1, डिघी 1, पिंप्री कोळी 2, नारखेड 1, खुदानपूर 2, तांदुळवाडी 4, खैरा 2, चांदुर 1, निमगाव 2, हिवरा 1, लोणवडी 1, शेंबा 1, वडाळी 1, जळगाव जामोद शहर : 6, जळगाव जामोद तालुका : वडगाव पाटण 1, मडाखेड 1, गोळेगाव 1, भेंडवळ 1, मूळ पत्ता अंदूरा ता. बाळापूर 1, हाता जि. अकोला 1, अमरावती 1, वालसावंगी ता. भोकरदन 1, भवरा ता. मुक्ताईनगर 1, पाटखेड ता. बार्शिटाकळी 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 773 रुग्ण आढळले आहेत.

6021 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात कोविड निदानासाठी 3963 नमुने घेण्यात आले आहेत. तसेच विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून आज 802 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोविड निदानासाठी 3963 नमुने घेण्यात आले आहेत. तसेच विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरमधून 802 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 197051 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 33102 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 26836 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 6021 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 245 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: