29 वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणातील 17 वर्षीय मुलाचे आत्मसमर्पण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 29 वर्षीय गतिमंद बालिकेवर बलात्कार करणार्या 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीने आज, 13 फेब्रुवारीला स्वतःहून बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. बाल न्यायमंडळाने त्याला 17 फेब्रुवारीपर्यंत बालगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.11 वीत शिकणार्या अल्पवयीन मुलाने 29 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील पळसखेड नाईक येथे 6 फेब्रुवारी रोजी घडली होती. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 29 वर्षीय गतिमंद बालिकेवर बलात्कार करणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीने आज, 13 फेब्रुवारीला स्वतःहून बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. बाल न्यायमंडळाने त्याला 17 फेब्रुवारीपर्यंत बालगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
11 वीत शिकणार्‍या अल्पवयीन मुलाने 29 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील पळसखेड नाईक येथे 6 फेब्रुवारी रोजी घडली होती. तरुणी गतिमंद असल्याचे सांगण्यात आले. 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 11.30 च्या सुमारास हा प्रकार घडला होता. तरुणी विधवा आईसोबत पळसखेड नाईक येथे राहते. आई मजुरी करून उदरनिर्वाह चालवते. 6 फेब्रुवारीला तिची आई शेतात कामासाठी गेली असताना तिच्या घरात घुसून मुलाने लैंगिक अत्याचार केला होता. घटना घडलेल्या दिवसापासून हा अल्पवयीन आरोपी फरार असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान आज आरोपीच्या वडिलाने अल्पवयीन आरोपीस पोलीस ठाण्यात हजर केले.