बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

2900 नव्‍या बुलडाणेकरांचे ‘ट्याहा ट्याहा’!; 1227 जणांचे ‘राम नाम…’

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहराच्या हद्दीत गेल्या वर्षी (जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020) या काळात 1227 जणांनी ही दुनिया कायमची सोडली, तर 2900 नव्‍या बुलडाणेकरांचे ट्याहा ट्याहा… करत आगमन झाले. वर्षभरात मृत्यू झालेल्यांत 765 पुरुष तर 462 महिलांचा समावेश आहे. नवीन जन्म झालेल्यांत 1582 पुरुष तर 1318 स्त्री जातीच्या बाळाचा समावेश आहे. त्यामुळे अजूनही मुलींच्या जन्मदर हा मुलांच्या तुलनेत 16 टक्क्यांनी कमी असल्याचे वास्तवही यानिमित्ताने समोर आले आहे.

कोणत्या महिन्यात किती मृत्यू…

जानेवारी-82,फेब्रुवारी-127, मार्च-63, एप्रिल-23, मे-100, जून-90, जुलै-109, ऑगस्ट-85, सप्टेंबर-184, ऑक्टोबर-127, नोव्हेंबर-104, डिसेंबर -133.

नव्या बुलडाणेकरांचे दुनियेत असे झाले आगमन…

जानेवारी -160, फेब्रुवारी-192, मार्च-234, एप्रिल-195, मे-219, जून-219, जुलै-276, ऑगस्ट-225, सप्टेंबर-297, ऑक्टोबर-296, नोव्हेंबर-270, डिसेंबर-317

एप्रिल महिन्यात सर्वात कमी मृत्यू; यावर्षी जानेवारीत सर्वाधिक जन्माची नोंद

मागील वर्षी एप्रिल महिन्यात बुलडाणा शहरात सर्वात कमी मृत्यूची नोंद करण्यात आली. एप्रिल 2020 मध्ये 23 मृत्यूंची नोंद करण्यात आली. यात 16 पुरुष तर 7 महिलांचा समावेश होता, तर जानेवारी 2021 मध्ये नवीन जन्मांच्या नोंदणीत मोठी वाढ झाली. जानेवारी 2021 मध्ये तब्‍बल 345  नव्‍या बुलडाणेकरांनी जन्म घेतला. यामध्ये 186 मुले आणि 159 मुलींचा समावेश आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: