क्राईम डायरीमुख्य बातम्या

3 म्‍हशींना निर्दयतेने कोंबून नेत होते… देऊळगाव राजा पोलिसांनी पकडले!; दोघांविरुद्ध गुन्‍हा दाखल

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः निर्दयतेने कोंबून तीन म्‍हशींची वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी आज, 8 जूनला गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही वाहनचालकाने भरधाव वाहन पळवून नेले होते. वाहनाचा पाठलाग करून ते जाफराबाद बायपासवर पोलिसांनी पकडले.

मोहम्मद जमील नदवी (रा. सस्ती ता. पातूर, जि. अकोला), सरफराज मोहम्मद मुस्ताक शेख (18, रा. अकोट फैल वॉर्ड क्रमांक 6 अकोला) अशी आरोपींची नावे आहेत. पोकाँ. गणेश काकड यांनी या प्रकरणात तक्रार दिली. 6 जूनच्‍या मध्यरात्री शहरातील आदर्श कॉलनी, भगवाननगर परिसरात होमगार्ड डोईफोडे यांच्‍यासोबत ते गस्‍त घालत होते. मध्यरात्रीनंतर 1 च्‍या सुमारास कुंभारी ते जाफराबाद बायपासने जितो नावाचे मालवाहू चारचाकी वाहन (क्रमांक MH-32 Aj-0340) संशयास्पदरित्‍या भरधाव जाताना त्‍यांना दिसले. त्‍यांनी थांबण्याचा इशारा करूनही वाहन थांबले नाही. संशय निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी मोटार सायकलने त्यांचा पाठलाग केला.

जाफराबाद बायपासजवळ सहायक फौजदार श्री. बुधवत व पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी वाहन थांबविले. वाहनाची पाहणी केली असता, दाटीवाटीने निर्दयतेने कोंबलेल्या 3 म्हशी दिसल्या. चालक व सोबत एक असे दोघे वाहनात होते. म्हशीच्या खरेदी-विक्रीच्‍या कोणत्‍याही पावत्‍या त्‍यांच्‍याकडे नसल्याने वाहन म्हशीसह पोलीस स्टेशनला आणण्यात आले. मोहम्मद जमीलने म्हशीच्या खरेदी-विक्रीच्या पावत्या आणून दिल्या तरी म्हशींना वेदना होतील अशा तऱ्हेने निर्दयतेने कोंबून व भरधाव घेऊन जात असल्याने दोघांविरुद्ध कलम 11(1)(ड) प्राण्यास निर्दयतेने वागणूक देणे प्रतिबंधक अधिनियम 1960 सह कलम 184, मोवाकाप्रमाणे गुन्‍हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: