3 महिला अन्‌ 1 पुरुष शेतात करत होते ते चुकीचे काम… शेतमालकाने रंगेहात पकडले!; नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतमालकाला न विचारताच शेतातून निंबू तोडून नेणाऱ्या 3 महिलांसह 1 पुरुषाविरुद्ध नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिला पळून गेल्या पण पुरुषाला शेतमालकाने पकडून ठेवले होते. ही घटना कोदरखेड (ता. नांदुरा) येथे 1 एप्रिलच्या सकाळी 10 च्या सुमारास घडली. झाले असे, की शेतकरी विनोद प्रमोद हाडे (35, …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतमालकाला न विचारताच शेतातून निंबू तोडून नेणाऱ्या 3 महिलांसह 1 पुरुषाविरुद्ध नांदुरा पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. महिला पळून गेल्या पण पुरुषाला शेतमालकाने पकडून ठेवले होते. ही घटना कोदरखेड (ता. नांदुरा) येथे 1 एप्रिलच्‍या सकाळी 10 च्‍या सुमारास घडली.

झाले असे, की शेतकरी विनोद प्रमोद हाडे (35, रा. कोदरखेड) यांची गट नं. 76 मध्ये शेती असून त्यांनी निंबूची लागवड केली आहे. सकाळी ते शेतात गेले असता एक पुरुष व तीन महिला निंबू तोडताना दिसले. त्‍यांनी त्यांच्याजवळ जाऊन विचारले तुम्ही कोण आहेत व कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही निंबू तोडत आहेत. हे विचारताच त्यातील महिला निंबूचे गोठोडे तेथेच सोडून पळून गेल्या. त्यातील पुरुषाला हाडे यांनी पकडून ठेवले.  गावातील लोकांना व पोलीस पाटलांना फोन करून शेतात बोलावून घेतले. त्या निंबू चोरणाऱ्या पुरुषाला त्याचे नाव व सोबत आलेल्या महिलांची नावे विचारली असता त्याने त्याचे नाव दसरथ तुकाराम गोरे (48, रा. पलसोडा), निर्मला दसरथ गोरे (45, रा. पलसोडा), सुशीला पद्माकर गोरे (35, रा. पलसोडा), रुक्मिणी संजू गोरे (27, रा. पलसोडा) असे सांगितले. दसरथ गोरे याने  40 किलो निंबू (अंदाजे किंमत 1600 रुपये) तोडले होते. त्‍याला सर्वांनी मिळून नांदुरा पोलीस स्टेशनला आणले. तिथे पोलिसांच्‍या ताब्‍यात त्‍याला देण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास पो.काँ,देवचे करीत आहेत.